शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
4
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
5
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
6
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
7
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
8
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
9
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
11
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

 पेसा क्षेत्रामधील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर! सर्वोच्च न्यायालयात एकीकडे तारीख पे तारीख, दुसरीकडे वेट ॲन्ड वाॅच

By गणेश वासनिक | Published: January 07, 2024 4:24 PM

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर 'तारीख पे तारीख' चालू असून दुसरीकडे शासन 'वेट ॲन्ड वॉच' भूमिकेत आहे.

अमरावती : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या याचिकेवर 'तारीख पे तारीख' चालू असून दुसरीकडे शासन 'वेट ॲन्ड वॉच' भूमिकेत आहे. सर्वोच्च न्यायालयात ९ जानेवारीला होणारी सुनावणी आता ३० जानेवारीला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रथम सुनावणी सुरू असताना निर्णयाची प्रत शासनाला येण्यापूर्वी त्याच दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य शासनाने घाईघाईने परिपत्रक निर्गमित करून अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे ‘पेसा’ क्षेत्रातील राज्यातील १३ जिल्ह्यातील पदभरती लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यपालांनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी ५ वी अनुसूचीच्या पॅरा ५ (१) नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात जनजाती सल्लागार परिषदेच्या शिफारशी नुसार अध्यादेश काढून त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात १०० टक्के, ५० टक्के आणि २५ टक्के (कोतवाल आणि पोलिस पाटील वगळता) आरक्षण दिले आहे. या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासनाने १ फेब्रुवारी २०२३ आणि २८ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मात्र ही अधिसूचना आणि शासन निर्णय यांना बिगर आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अनुसूचित क्षेत्रात राहणाऱ्या बिगर आदिवासींना नोकरीपासून वंचित ठेवल्याने मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा दावा बिगर आदिवासींनी केला आहे. या १३ जिल्ह्यांतील भरती थांबलीसर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवडप्रक्रियाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये, असे निर्देश दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या १३ जिल्ह्यांतील १७ संवर्गातील भरतीप्रक्रिया प्रभावित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दि. १३ ऑक्टोबर २०२३च्या निर्णयात भरतीप्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही अथवा भरतीप्रक्रिया थांबवा, असे म्हटले नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. वेळ वाया न घालवता भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी. सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश आल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत. - ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक-अध्यक्ष ट्रायबल फोरम 

टॅग्स :AmravatiअमरावतीCourtन्यायालय