लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावर (सीएचबी) अध्यापकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्याकरिता ५, ६ व ७ आॅगस्ट रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षेत निवड समिती सीएचबी अध्यापकांची निवड करणार आहे.सीएचबी अध्यापकांच्या भरतीसाठी विद्यापीठाने १७ जुलै रोजी जाहिरात प्रकाशित केली होती. त्याअनुषंगाने २७ जुलैपर्यत उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज विद्यापीठाकडे सादर केले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहे. यात पीएच.डी, नेट-सेट, एम.फिल धारक सीएचबी अध्यापक भरतीसाठी रांगेत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षित तरूणांची बेरोजगारीची मोठी संख्या असल्याचे स्पष्ट होते. शासन निर्णयानुसार सीएचबी अध्यापकांना ५०० रूपये तासिका प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. या भरतीत आरक्षण लागू करण्यात आले आहे. शासनमान्य मंजूर पदांना आठवड्यातून ९ तासिका सीएचबी अध्यापकांना दिल्या जातील. ही भरती करताना उमेदवारांना विषय पदव्युत्तरासाठी ५५ टक्के गुणांची अट कायम ठेवली आहे. नेट-सेट, पीएच.डी. धारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक विभागात सामान्य आणि राखीव पदांसाठी सीएचबी अध्यापकांची भरती प्रक्रिया राबविली जात असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपकुलसचिव प्रवीण राठोड यांनी दिली. सोमवारी भरतीचा पहिला दिवस आहे.२८ विभागांसाठी हंोणार मुलाखतीअमरावती विद्यापीठात २८ विभागासाठी सीएचबी अध्यापकांच्या मुलाखतींचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यात ५ आॅगस्ट रोजी गणित, सांख्यिकी, रसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशासत्र, भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायन तंत्रज्ञान, भूगर्भशास्त्र, अप्लाईड इलेक्ट्रानिक्स या विभागासाठी मुलाखती होतील. ६ आॅगस्ट रोजी एमबीए, कॉमर्स, आजीवन शिक्षण, गृहविज्ञानशास्त्र, शिक्षण, शारीरिक शिक्षण, वाचनालय आणि माहिती विज्ञान, महिला शिक्षण केंद्र, संगणक तर ७ आॅगस्ट रोजी इंग्रजी, हिंदी, सामाजिकशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, विधी विभागासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तासिका तत्त्वावरील अध्यापकांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:18 PM
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तासिका तत्वावर (सीएचबी) अध्यापकांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्याकरिता ५, ६ व ७ आॅगस्ट रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षेत निवड समिती सीएचबी अध्यापकांची निवड करणार आहे.
ठळक मुद्दे५, ६ व ७ आॅगस्ट रोजी मुलाखती : पदव्युत्तरच्या सर्वच विभागात मिळणार संधी