लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यप्रदेशातून वाहनात कोंबून अमरावतीत कत्तलीसाठी आणल्या गेलेले ५२ गोवंश स्थानिक लालखडीच्या अकबरनगर गोदामातून गुरूवारी सकाळी ११ वाजता दरम्यान ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी एम.पी. २२ एच-८२७ क्रमांकाचा ट्रकचालक आणि गोदाममालक आतिक कुरेशी यांच्याविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.पोलीस सूत्रानुसार, ताब्यातील जनावरांचे बाजारमूल्य पाच लाख रूपये आहे. यातील पाच जनावरे गंभीर असल्याने ती दगावण्याच्या स्थितीत आहे. ही कारवाई पोलीस आणि महापालिका पशू वैद्यकीय विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आली. यावरून लालखडी परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे स्पष्ट होते. ट्रकचालक पसार झाला आहे.‘लोकमत’ने १० मार्च रोजी ‘लालखडीत अवैध कत्तलखाने’ या शीर्षकाखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामी लागली. लालखडी भागाच्या अकबर नगरातील अवैध कत्तलखाने, गोदामांवर पाळत ठेवली गेली. मध्यप्रदेशातून कत्तलीसाठी येणाऱ्या जनावरांच्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर होती. यात काही खुफिया कामी लागले होते. गुरूवारी लालखडी परिसरात गोदामात जनावरे आणले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. ट्रकमध्ये गोवंश कोंबल्याचे दिसून आले. मात्र, पोलीस आल्याचे बघून ट्रकचालक आणि गोदाम मालक पसार झाले. त्यानंतर नागपुरी गेट पोलीस व महापालिका पशूवैद्यकीय विभागाने जनावरे ताब्यात घेतली. ट्रकमधून जनावरे कोंबून आणल्याने पाच जनावरे गंभीर स्थितीत होते. या जनावरांचा पंचनामा करून उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत.ही कारवाई नागपुरी गेट पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास धोंडे, विलास पोहेकर, जमादार प्रमोद गुडधे, शिपाई रहमी कालीवाले, ईस्त्राईल शाह, संजय वानखडे, मारोती कळंबे, योगेश गावंडे, ईमरान खान, नवाब खान, तसेच महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे, निरीक्षक पंकज कल्याणकर, गुणसागर गवई आदींनी केली.लालखडी परिसरातील गोदामातून ५२ गोवंश ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने सहकार्य घेतले.- अर्जुन ठोसरेपोलीस निरीक्षक, नागपुरी गेट .गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस प्रशासन, महापालिकेने संयुक्तपणे ही कारवाई केली. ताब्यातील ५२ पैकी पाच गोवंश गंभीर स्थितीत आहेत. मध्यप्रदेशातून ती आणल्या गेली. त्यांचे बाजारमूल्य पाच लाख रूपये आहे.- सचिन बोंद्रे,पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
लालखडीतून ५२ जनावरे पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:18 PM
मध्यप्रदेशातून वाहनात कोंबून अमरावतीत कत्तलीसाठी आणल्या गेलेले ५२ गोवंश स्थानिक लालखडीच्या अकबरनगर गोदामातून गुरूवारी सकाळी ११ वाजता दरम्यान ताब्यात घेण्यात आली.
ठळक मुद्देदोघांविरूद्ध गुन्हा : पाच जनावरे गंभीर, बाजारमूल्य पाच लाख रूपये