आॅनलाईन लोकमतअमरावती : स्थानिक नेहरू मैदानातील महापालिकेच्या लाल शाळेला बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पहिल्या मजल्यावरील प्रयोगशाळा कक्ष जळून खाक झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल दीड तास प्रयत्न करावे लागले. ही आग कशामुळे लागली, याचे ठोस कारण कळू शकले नाही. रात्री ९ च्या सुमारास १२ बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आली.सन १९२८ साली बनलेल्या कै.नानासाहेब गोखले स्मारक या इमारतीत महापालिकेतर्फे मुला-मुलींची स्वतंत्र शाळा चालविली जाते. या शाळेच्या दुमजली इमारतीतील प्रयोगशाळेला आग लागली. शाळेच्या शेजारी मोठे व्यावसायिक संकुल, बँक आहे. आग लागल्याची माहिती मिळताच महापौर संजय नरवणे, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, आयुक्त हेमंत पवार यांच्यासह नगरसेवक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग पुन्हा लागू नये म्हणून रात्रभर दोन बंब ठेवण्यात आले आहेत.प्राथमिक माहितीनुसार ती खोली बंदावस्थेत होती. संपूर्ण इमारत लाकडाची असल्याने आग त्वरेने पसरली. दीड तासानंतर आग आटोक्यात आली.- हेमंत पवार, आयुक्त
लाल शाळेला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:50 PM
स्थानिक नेहरू मैदानातील महापालिकेच्या लाल शाळेला बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
ठळक मुद्देप्रयोगशाळा कक्ष खाक : दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात