लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.१३ कोटी वृक्षलागवडीत राज्य शासनाने अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या सेवाभावी संस्था, वनाधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा संकल्प सोडला आहे. १३ कोटी वृक्षलागवडीत वडाळी वनपरिक्षेत्रातील पोहरा वनक्षेत्रात तब्बल १ लक्ष ४५०० रोपे लागवड करणाऱ्या पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल एका कार्यक्रमात गौरविण्यात आले. रोपवनाचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे नवा आदर्श ठेवत वनसंवर्धनाचा वेगळा संदेश देणाऱ्या वडाळीचे वनपाल राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांनासुद्धा गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक हेमंत मीणा, अविनाश कुमार, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, राजेंद्र बोंडे व अमरावती वनविभागाच्या विविध शाखेचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव संरक्षक स्वप्निल सोनोने, जयंत वडतकर व वनकर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत वन कर्मचाऱ्यानी स्वत:ला झोकून देत उद्दिष्टपूर्ती केली. सामूहिक प्रयत्नाने जिल्ह्यात वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण झाले. त्याकरिता सूक्ष्म नियोजन, रोपवाटिकेतील कर्मचाºयांचे परिश्रम आदी बाबी महत्त्वाच्या ठरल्या, ही बाब त्यांनी आवर्जून मांडली. डीएफओ मीणा यांचे नियोजनाबाबत सीसीएफने कौतुक केले.जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार वृक्षलागवडशासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यात ३२ लाख ८६ हजार ५५१ इतकी लागवड झाली असून, २६ लाख इतक्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १२६.६३ टक्के इतके आहे. सर्व विभागांनी व समाजातील विविध घटकांनी मिळून ही मोहीम राबविल्याने हे यश मिळू शकले, असे जिल्हा उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिणा यांनी सांगितले. येथील महादेवखोरी परिक्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते १ जुलैला झाला होता. ३१ जुलै दरम्यान विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती निवृत्त सहायक उपवनसंरक्षक बी.टी. इंगळे यांनी दिली आहे.
उत्कृष्ट कार्याबद्दल वनकर्मचाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 10:17 PM
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी १३ कोटी वृक्षलागवडीत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या अमरावती वनविभागातील वनपाल विनोद कोहळे, राजेश घागरे व वनरक्षक प्रफुल्ल फरतोडे यांना उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार मिळाला आहे. अमरावती वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवडीत योगदान : अमरावती वनविभागाचा उपक्रम