शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कूलसचिव, अधिष्ठाता अवैध नियुक्तीबाबत ‘नुटा’ राज्यपालांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 6:43 PM

अमरावती विद्यापीठात जून २०१९ मध्ये कुलसचिव, अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती अवैध असल्याप्रकरणी ‘नुटा’ संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

गणेश वासनिकअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जून २०१९ मध्ये कूलसचिव, अधिष्ठातापदी झालेली नियुक्ती अवैध असल्याप्रकरणी ‘नुटा’ संघटनेचे पदाधिकारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याअनुषंगाने राज्यपाल कोश्यारी यांना अमरावती दौ-यात भेटीचा वेळ मागितला असून, लवकरच ई-मेल पाठविला जाणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार अमरावती विद्यापीठाने १५ मे २०१९ रोजी कुलसचिव, अधिष्ठाता नियुक्तीबाबत जाहिरात काढली होती. मात्र, ही जाहिरात काढताना विद्यापीठाकडून कालबाह्य निदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी व अविनाश मोहरील यांची नियुक्ती अवैध असल्याची तक्रार ‘नुटा’ संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी, विवेक देशमुख, भीमराव वाघमारे, रवींद्र मुंद्रे, विजय कापसे या अधिसभा सदस्यांनी राज्यपालांकडे केली होती.या तक्रारीची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली असून, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, उच्च शिक्षण विभागाकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २० डिसेंबर रोजी अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ‘नुटा’ संघटनेच्या पदाधिका-यांनी विद्यापीठात नियमबाह्य सुरू असलेला खेळखंडोबा थेट राज्यपालांच्या पुढ्यात मांडण्याची रणनीती आखली आहे. त्यानुसार ‘नुटा’ १६ डिसेंबर रोजी राज्यपालांना ई-मेल पाठवून अमरावती दौ-यात भेटीसाठीचा वेळ मागणार असल्याची माहिती अधिसभा सदस्य विवेक देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

अधिष्ठातांच्या वेतनाचे काय?एफ.सी. रघुवंशी यांच्या अधिष्ठातापदी अवैध नियुक्तीबाबत ‘नुटा’ने जोरदार आक्षेप घेतला आहे. रघुवंशी यांनी प्राचार्य पदावरून स्वेच्छानिवृत्ती दिल्याची माहिती असतानासुद्धा कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी नियुक्ती का केली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. अधिष्ठाता वेतनाचा मुद्दा राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. अधिष्ठाता रघुवंशी यांचे शासनाने वेतन नाकारल्यास सहा महिने कर्तव्याचे वेतन विद्यापीठ कसे देणार, हा विषय येत्या काळात गंभीर होणार आहे. तर विद्यापीठ प्रशासनाने अधिष्ठाता रघुवंशी यांचे वेतन सामान्य निधीतून देण्याची तयारी चालविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.