विनाक्रमांकाची वाहने रस्त्यावर : आरटीओ, पोलिसांशी वाहनधारकांचा असहकारअमरावती : शोरुममधून घेतलेल्या नवीन वाहनांना दीड-दोन महिने क्रमांक मिळत नसल्याने एजंट वा शोरुम कर्मचाऱ्यांची लेटलतीफी वाहनचालकांच्या मूळावर उठली आहे. या लेटलतिफीला काही अंशी आरटीओमधील नोंदणीची भाऊगर्दी कारणीभूत असली तरी ‘बल्क’ नोंदणीमुळे वाहन चालकांना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागते. शहरात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकरणांमध्ये विना क्रमांकाच्या दुचाकी वापरल्या गेल्याने पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी फेब्रुवारी महिन्यात मोहीम चालविली होती. विना क्रमांकाच्या दुचाकी मालकांवर दंडाचा बडगा उगारला गेल्या. या पार्श्वभूमिवर वाहनाचा क्रमांक मिळविण्यासाठी होत असलेली लेटलतीफी ऐरणीवर आली आहे. शोरुममधील कर्मचाऱ्यांना या लेटलतीफीचे कारण विचारल्यास ते आरटीओंकडे बोट दाखवितात. वेळेवर दस्तऐवज पुरविल्यानंतरही आरटीओंकडून वाहन क्रमांक आणि नोंदणीस उशिर होत असल्याचे सांगतात. वाहनधारक स्वत: करू शकतात नोंदणीअमरावती : वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. वाहन खरेदी केल्यानंतर दीड ते दोन महिने वाहनांना क्रमांकच मिळत नाहीत. अशा परिस्थितीत पोलिसांनी वाहन पकडल्यास वाहन चालकांना शारीरिक व मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. नोंदणी शुल्क, विमा व अन्य सर्व रक्कम अदा केल्यानंतरही शोरुमधारकांकडून वाहन क्रमांकासाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जाते. ‘रजिस्ट्रेशन’ केल्याशिवाय नवीन वाहन चालकाच्या सुपूर्द करु नये, अशी कायदेशीर जबाबदारी दुचाकी विक्रेते/डिलरवर आहे. त्यामुळे दररोज ऐवजी गठ्ठ्याने केव्हातरी नोंदणीसाठी कागदपत्रे पोहोचविली जातात. त्यामुळे नोंदणी आणि पर्यायाने वाहनांना क्रमांक मिळत नाहीत. तथापि ‘शोरुम एजंट वा डिलरवर नोंदणीची जबाबदारी सोपविण्याऐवजी वाहनचालक स्वत: आरटीओ कार्यालयात जाऊन २० क्रमांकाचा फॉर्म भरुन वाहन नोंदणी करू शकतात. वाहन फायनान्सवर घेतले असल्यास १७ क्रमांकाचा फॉर्म भरणेही क्रमप्राप्त आहे. एसीपींकडून भक्कम पाठपुरावावाहन विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानधारकांनी वाहन क्रमांक वाहनाच्या नंबरप्लेटवर दर्शविल्यानंतर ते वाहन संबंधितांच्या ताब्यात द्यावे. विनाक्रमांकाचे वाहन ताब्यात देऊ नये, अशा स्पष्ट सूचना वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे यांनी शहरातील वाहनविक्री प्रतिष्ठानाला दिल्या आहेत. याशिवाय वाहनधारकांंना वाहन क्रमांक त्वरित मिळावा, याकरिता कारवाई करावी, अशी विनंती आरटीओंना सुध्दा केली आहे. सर्व डिलर्सना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहेत. वाहनांवर क्रमांक हवाचचेन स्नॅचिंग, रोड रॉबरी, जबरी चोरी या घटना वाढल्या आहेत.या घटनांमध्ये विना क्रमांकाची वाहने वापरली जातात. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना वाहन क्रमांक दिसत नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी वाहन क्रमांक प्राप्त झाल्यानंतरच ते वाहन ताब्यात द्यावे, अशी भूमिका वाहतूक शाखेने घेतली आहे. (प्रतिनिधी)
नोंदणी ‘लेटलतिफी’ वाहन चालकांच्या मुळावर !
By admin | Published: March 03, 2016 12:17 AM