सुपर स्पेशालिटी, इर्विनमध्ये गर्दी ओसरली, कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या घटली
अमरावती : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा तोकडी पडल्याने आरोग्य विभागाने कंत्राटी पदभरती करून साथ थोपविण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. आता कोरोना आटोक्यात आहे. हल्ली कोविडयोद्धांना नियमित मानधन मिळत आहे, मात्र, नोकरी कधी गमवावी लागेल, हे सांगता येत नाही.
कोरोनाकाळात डॉक्टर, ईसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डॉक्टर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधनिर्माता, अधिपरिचारिका या पदांवर ११५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. मात्र, मध्यंतरी कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत ३०८ कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आता दुसऱ्या लाटेनंतर ११५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. तिसरी लाट येणार असल्याच्या भीतीपोटी कंत्राटी कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या कोविडयोद्ध्यांची किती दिवस नोकरी सुरक्षित राहील हे सांगता येणार नाही, यात दुमत नाही.
-------------------------
कोरोनाकाळात मानधनावर घेतलेले कर्मचारी १४५८
सध्या कामावर असलेले कर्मचारी : ११५०
महिनाभरापासून कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा : ४६८
सध्या सुरू असलेले कोविड केअर सेंटर : २८
-------------------
बॉक्स
सध्या कोणत्याही कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले नाही. कोविड रुग्णालयात रुग्ण कमी असले तरी नियमित मानधन दिले जात आहे. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे कंत्राटी कर्मचारी कमी करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. ११ महिन्यांसाठी करारनामा आहे. एजन्सीमार्फत नियुक्ती देण्यात आली असून, तसा बाँड त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या २८ ठिकाणी कोविड केंअर केंद्र सुरू आहे.
---------------
कोट
मानधन मिळतेच कायमस्वरूपी नोकरी केव्हा?
मागील दीड वर्षांपासून जोखीम पत्करून कोरोनारुग्णांची सेवा केली. मध्यंतरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात सामावून घेतले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. मात्र, ही घोषणा केवळ घोषणाच राहू नये, ही अपेक्षा आहे. आमच्या भविष्याचा विचार व्हावा.
- आकाश पाटील, कंत्राटी कर्मचारी
-----------
आरोग्य विभागाला तिसरी लाट येणार असल्याची माहिती आहे. यानंतरही आरोग्य विभागाने कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही. कोरोनाकाळात जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावले. आता तरी रोजगाराचा निर्णय घ्यावा.
- मंगला मनवर, सफाई कर्मचारी
कोरोनाकाळात जोखमीची कामे पत्करून निरंतर सेवा दिली. या कामाचे मानधन मिळते. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेलाही प्राधान्य मिळावे. कायमस्वरूपी आरोग्य कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक सेवा त्यांनी दिली आहे.
- सूरज वाघमारे, कंत्राटी कर्मचारी
---------
बॉक्स
आर्थिक तरतुदीअभावी मानधनास विलंब
१) कोविडमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन वितरित करताना दरमहा विलंब लागला आहे.
२) एका महिन्याचे मानधन दुसरा महिना अर्धा संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पडले आहे.
३) सर्वात अखेरच्या महिन्यात ज्या कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले त्याला आर्थिक तरतुदीचा अडथळा आहे.
४) कर्मचाऱ्यांना लवकरच मानधन उपलब्ध होणार आहे. यामुळे कामाचा मोबदला मिळेल, यात शंका नाही.
----------------
कोट
निधी येण्यास अडचण आल्यानंतरच यापूर्वी दाेन ते तीन वेळा कर्मचाऱ्यांचे मानधन थांबले. फार विलंब झाला असे कधीच झाले नाही. आता तर नियमित मानधन दिले जात आहे.
- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक.