लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी गुरूवार २८ सप्टेंबर रोजी शहर काँग्रेसअध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्राधिकरण कार्यालवर धडक दिली.यावेळी मजीप्राचे अधीक्षक अभियंता एस.एस.चारथळ यांच्यासोबत काँग्रेस पदाधिकाºयांनी चर्चा केली. पाणीपुरवठ्या संदर्भातील विविध मुद्यांकडे त्यांनी अधिकाºयांचे लक्ष वेधले. यात लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला पाण्याची गरज किती, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. यावर अमरावती, बडनेरा शहराला अप्परवर्धा धरणातून रोज ११५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शहरात ९५ दशलक्ष लीटर जलशुद्धीकरणापुरतीच यंत्रणा असल्याने पाणीपुरवठ्यावरील ताण वाढल्याचे चारथळ यांनी सांगितले.शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. मात्र, त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याबाबत काँग्रेस पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला असता तांत्रिक अडचणी असल्याचे स्पष्टीकरण अधिकाºयांनी दिले. सध्या पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही कामे केली जाणार आहेत.आश्वासनानंतर निवळले आंदोलनशहरात ११ नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत. यामुळे अनियमित पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, पाणीपुरवठयाच्या पाइपलाईनसाठी खोदलेले रस्ते व खड्डे दुरूस्त होत नाहीत. याशिवाय कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, सार्वजनिक नळ कुठल्याही परिस्थितीत बंद करू नयेत, असा मुद्दा मांडण्यात आला. माजी महापौर विलास इंगोले, किशोर बोरकर, प्रशांत डवरे, हरिभाऊ मोहोड, वंदना कंगाले, सुरेश स्वर्गे यांनी आक्रमक भूमिका घेत नादुरूस्त रस्ते त्वरित दुरूस्त करण्याची मागणी केली. यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.वार्षिक पर्जन्यमानात आलेली तूट व अप्पर वर्धा प्रकल्पातील अल्पसाठ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका क्षेत्रात दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय मजीप्राने घेतला होता. याची अंमलबजावणी ११ सप्टेंबरपासून शहरात सुरू झाली होती. मात्र, आता अपरवर्धा धरण शंभर टक्के भरल्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विलास इंगोले, किशोर बोरकर यांनी यावेळी रेटून धरली. शहर काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत अधीक्षक अभियंता चारथळ यांनी येत्या दोन दिवसात शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन निवळले. यावेळी गणेश पाटील, नानाभाई सोनी, पुरूषोत्तम मुदंडा, बी.आर.देशमुख, राजा बांगळे, भैया पवार, अंबादास मोहिते, राजेंद्र लुणावत आदी उपस्थित होते.
शहरात लवकरच नियमित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:32 PM
उर्ध्व वर्धा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा गोळा झाल्यानंतरही शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ठळक मुद्देअधीक्षक अभियंत्यांचे आश्वासन : शहर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा