लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ढाणा येथील वस्तीला आगीत नुकसान झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तत्काळ व्हावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.मेळघाटातील सेमाडोहनजिक ढाणा वस्तीला लागलेल्या आगीत ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी नुकतीच केली व आपदग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आ.प्रभुदास भिलावेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकमत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली व त्यांचे सांत्वन केले. नागरिकांना पक्के घर व त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही करावी. भविष्यात आग लागू नये यासाठी व तशी दुर्घटना झाल्यास त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.कर्जमाफीच्या अर्जाला मुदतवाढछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांसाठी अर्ज करण्यास १ मेपर्यंत संधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सोमवारी घेतला. १४ एप्रिल रोजी ही मुदत संपली होती. या संधीचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
पुनर्वसनाची कार्यवाही व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 10:25 PM
ढाणा येथील वस्तीला आगीत नुकसान झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तत्काळ व्हावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.
ठळक मुद्देपालकमंत्री : आपादग्रस्थांना मदतीचा हात