लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगात देव येण्याचे सोंग करणाऱ्या पवन महाराजचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पवन महाराज न्यायालयात हजर होईल, या शक्यतेमुळे गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयाबाहेर सापळा रचून ठेवला होता. मात्र, तो न्यायालयात आलाच नाही. पोलिसांनी आता त्याच्या अटकेसाठी युद्धस्तरावर शोधमोहीम चालविली आहे.कांतानगरातील पवन घोंगडे ऊर्फ पवन महाराज याच्या वकिलांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयात 'से'दाखल केला. गुरुवारी यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश (५) विमलनाथ तिवारी यांच्या न्यायालयात सुनावणी होती. गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासह अंनिसचे गणेश हलकारे न्यायालयात हजर होते. सरकारी अभियोक्ता संदीप ताम्हणे यांनी न्यायालयात काही मुद्दे मांडले. आरोपी पवन घोंगडे हा ‘स्वयंघोषित गॉड’ बनला. त्याने कोणाकोणाची फसवणूक केली, याबाबत पोलीस कोठडीत त्याची चौकशी केल्यानंतरच सर्व मुद्दे उघड होतील. असे गुन्हे समाजात वाढत असल्याने पवन घोंगडेला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद ताम्हणे यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने पवनचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.लोकेशन मिळेनामहाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या भोंदूबाबा पवन महाराजने सोप्या पद्धतीने पैसे कमाविण्यासाठी भोंदुगिरी सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर व त्याच्या आई-वडिलांना अटक केल्यानंतर पवन महाराज पसार झाला आहे. त्याच्याजवळ मोबाइल नसल्यामुळे पोलिसांना लोकेशन मिळणे कठीण झाले आहे. तो आता भक्तांच्या ‘शरणा’ला असल्याचा संशय बळावला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत.
पवन महाराजचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:46 PM
अंगात देव येण्याचे सोंग करणाऱ्या पवन महाराजचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. पवन महाराज न्यायालयात हजर होईल, या शक्यतेमुळे गाडगेनगर पोलिसांनी न्यायालयाबाहेर सापळा रचून ठेवला होता. मात्र, तो न्यायालयात आलाच नाही. पोलिसांनी आता त्याच्या अटकेसाठी युद्धस्तरावर शोधमोहीम चालविली आहे.
ठळक मुद्देयुद्धस्तरावर शोधमोहीम : अटकेसाठी पोलिसांचा न्यायालयाबाहेर सापळा