लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लग्नसंबंध जुळू न शकल्याने एका एनआयआर तरुणाने येथील एका तरुणीच्या छायाचित्रांचे अश्लील मॉफिंग केले. तो एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने त्या तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. तथा खोटी वेबसाइटदेखील बनविली. त्या वेबसाइटवर फिर्यादी तरुणीचे नग्न, अर्धनग्न फोटो अपलोड करून तिची बदनामी केली. ११ जुलै २०२२ ते २ मार्च २०२४ या दरम्यान तो प्रकार घडला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ८ जून रोजी दुपारी आरोपी पुर्विन वखारवाला (३५, रा. एलिन्स्टन पीएल, जॉन्स क्रिक, यूएसए) याच्याविरुद्ध विनयभंग, आयटी अॅक्ट बदनामीचा गुन्हा दाखल केला.
व सन २०२२ मध्ये आरोपी पुर्विन वखारवाला हा फिर्यादी तरुणीला लग्नसंबंधाच्या निमित्ताने पाहणी करण्यास आला होता. मात्र तरुणीकडील मंडळींला ते स्थळ पसंत नसल्याने त्यांनी नापसंती दर्शविली. तसे त्याला कळविण्यातदेखील आले. मात्र त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅप, ई- मेल अशा विविध माध्यमांतून फिर्यादी तरुणीची इच्छा नसताना तिचा ऑनलाइन पाठलाग करून संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीने त्यास स्पष्ट नकार दिल्याने त्याने चिडून जाऊन तिची बदनामी केली.
आयएसडी कॉल आरोपीने फिर्यादीचा चेहरा वापरून तिचे अश्लील छायाचित्रे तयार केली. ती एफबीवर प्रसारित केली. व्हॉट्सअॅप, ई-मेलद्वारे तरुणीचे नातेवाईक व मित्र, मैत्रिणींना पाठविले. तसेच तिला रात्री अपरात्री आयएसडी कॉल करून तिचा ऑनलाइन पाठलाग केला. फिर्यादीच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाइल आणि फेक वेबसाइट तयार केली. तथा वेबसाइटवर नग्न, अर्धनग्न फोटो अपलोड करुन त्याने तरुणीची बदनामी केली.