लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चंद्रपूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा एक नातेवाईक धामणगाव शहरात आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले.रेड झोन असलेल्या यवतमाळ येथे काही दिवस मुक्कामाला असलेली महिला चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आढळली. ज्या व्यक्तीकडे ती मुक्कामी होती, त्या व्यक्तीचे थ्रोट स्वॅब घेऊन यवतमाळ येथे होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, चालक असलेला तो व्यक्ती बुधवारी मालवाहू ट्रक घेऊन धामणगाव शहरात आला होता. या ट्रकमधून माल उतरविणाऱ्या तथा जवळपास असलेल्या ५० लोकांच्या तो संपर्कात आला असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यांना होम तथा सेल्फ क्वारंटाईन करण्यात आले आहेत.चंद्रपूर येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने बुधवारी शहरात ट्रक घेऊन प्रवेश केला होता. संबंधित व्यक्तीचे थ्रोट स्वॅब अहवाल यवतमाळ येथून प्राप्त व्हायचा आहे. सध्या संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाईन करण्यात आले. घाबरण्याचे कारण नाही.- महेश साबळे,अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे
चंद्रपूरच्या कोरोनाबाधिताचा नातेवाईक धामणगावात; शहरात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 6:25 PM
चंद्रपूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा एक नातेवाईक धामणगाव शहरात आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले.
ठळक मुद्दे५० जण होम क्वारंटाईन