अमरावती : शासन व प्रशासनाने ९ ते १५ मे दरम्यान लॉकडाऊन लावीत कडक निर्बंध घातले आहे. विनाकारण फिरणाऱ्यावर थेट गुन्हा नोंदविला जात आहे. मात्र, शहरातील मुख्य चौक जर सोडले तर हद्दीतील काही नाकाबंदी पाॅइंटवर शिथिलता दिली जात असल्याचे चित्र आहे. विनाकारण फिरणाऱ्याला हटकले नाही त्याच्यावर कारवाई केली जात नसेल कसे रोखणार कोरोनाला असा सावल केला जात आहे.
पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४५ ठिकाणी फिक्स पॉइंट तर सात ठिकाणी शहर हद्दीत येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी नाकाबंदी पॉइंट लावले आहे. मात्र, सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास वलगाव येथील परतवाडा- दर्यापूर मार्गावरील नाकाबंदी पॉइंटवर पोलीस होते मात्र फारसे वाहन चालकांना हटकले नाही. तसेच वलगाव ठाण्यासमोर पोलीसच नव्हते, तसेच चांगापूरजवळ एक वाहतूक पोलीस कार्यरत होते मात्र कुणालाही चेक केले जात नव्हते. मात्र कठोरा नाका पाॅईंट, शेगाव नाका, पंचवटी चौक तसेच इर्विन चौकातील वाहतूक शाखा पॉईंट, राजकमल चौक, जयस्तंभ चौकावर कसून चौकशी करीत कारवाया करण्यात आल्या. दुपारी १२ नंतर ५ वाजेपर्यंत नाकाबंदी पाॅईंटवर ढिल दिल्या जात आहे. त्यादरम्यान शहरात अनेक नागरिक विनाकारण फिरताना आढळून येत आहे. रात्री ९ वाजतानंतर सुद्धा पोलीस रिलॅक्स होतात. काही ठिकाण इव्हनिंग वाकला नागरिक जात आहेत. कारवाया वाढिवल्यास कोरोनाला थांबविणे शक्य होऊ शकते. तसेच प्रत्येक कॉलनीत पोलिसांनी एकदा तरी गस्त घालावी.