अमरावती : भारतातील आणि विदेशी भारतीयांच्या बाल गोपालांसाठी प्रेरक कथाकोष ऑनलाइन १५ ऑगस्ट २०२१ स्पर्धा कवियत्री पर्यावरण संरक्षक,आर्टिस्ट कोची वर्षा चोपडे आणि प्रसिद्ध उद्योजिका, थिएटर आर्टिस्ट, लेखिका, कवियत्री मुंबईच्या मनीषा काटकर यांच्यातर्फे देशभक्ती गीत स्पर्धा विनाशुल्क घेण्यात आली. यात तिवसा येथील धार्मिक इंगोले विजेता ठरला.
या स्पर्धेत भारतातून ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुले, मुली सहभागी झाले होते. यामध्ये श्री देवराव दादा हायस्कूल तिवसा येथील विद्यार्थी धार्मिक सुनील इंगोले या विद्यार्थ्याने तबला वाजवून देशभक्तीपर गीत सादर केले. त्या सादरीकरणाचा व्हिडीओ पाठवण्यासाठी काकड यांनी मार्गदर्शन केले. त्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चव्हाण तसेच जोशी, साळकर, भालेराव, गौर, पंचारिया, पटेल, तायडे सखे यांचे आभार मानले. त्यासाठी संगीत मार्गदर्शन गुरुसिद्धी संगीत विद्यालय तिवसा प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुनील इंगोले यांनी केले. हितचिंतक स्व.आर .जी .देशमुख कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम, स्व. लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य सुजाता तायडे, प्राचार्य स्व. आर.जी. देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत देशमुख, अनंत सरनाईक, हेमंत पवार, केने, उमेश तीवसकर, बलदेव इंगोले, स्नहांशु हेंडवे, ऋग्वेद राजूरकर आदींनी त्याचे कौतुक केले. उपदेश इंगोले यांनी आभार मानले.