फोटो - राऊत फोल्डर १५ पी
धामणगाव रेल्वे : वर्धा नदीकाठी असलेल्या वकनाथ येथील हेमाडपंथी महादेवाच्या मंदिराचे अवशेष गावात पाहायला मिळत आहेत. येथे कार्तिक स्वामी गणपती महादेवाची पिंड, धन्वंतरी मूर्तीचे अवशेष गाव ऐतिहासिक असल्याची साक्ष देत आहेत.
धामणगाव तालुक्यातील १७०० लोकसंख्येचे वकनाथ हे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक ओळखले जाते. हे गाव विदर्भात खव्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील खव्याची मागणी मुंबईलादेखील असते. पूर्वीच्या काळात गवळी समाजाची हेटी व नाथपंथी तसेच गोसावी बांधवाची स्वतंत्र येथे दोन गावे होती. काळाच्या ओघात ही गावे ओसाड झाली. मात्र, या दोन वस्त्या दर्शविणारी मारुती व जाठोबाची मंदिरे या परिसरात आजही आहे. गावाशेजारी हेमाडपंथी महादेवाचे मंदिर होते, असे येथील ग्रामस्थ सांगतात. कार्तिक स्वामी, गणेश मूर्ती व शंकराची पिंड येथे आहे. लक्ष्मीचे जागृत मंदिर या गावात आहे.
--------------------
आधुनिक आरोग्य यंत्रणा अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळात एखाद्या व्यक्तीला साप दंश झाला, तर ते विष उतरविण्याचे काम येथे होत असे. या हेमाडपंथी महादेवाचे मंदिराचे अवशेष आजही आमच्या गावात जतन केले जात आहेत.
- सुरेंद्र हलमारे, ग्रामस्थ, वकनाथ