आॅनलाईन लोकमतपरतवाडा : पुनर्वसित आठही गावांत आदिवासींचे आंदोलन सुरूच आहे. एकही आदिवासी जंगलाबाहेर निघाला नाही, सत्ताधाऱ्यांचे थापा मारणे बंद करून त्यांच्या हातात सातबारा द्या आणि तेथे घर बांधून द्या, त्यांच्या जिवाचे बरे-वाईट झाले तर शासन-प्रशासनाला सोडणार नाही. काँग्रेस आंदोलकांसोबत असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.शनिवारी चिखलदरा तालुक्यातील सोमठाणा बु., अमोना, गुल्लरघाट, केलपाणी, बारूखेडा, नागरतास, सोमठाना खुर्द आदी आठही गावात जाऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार केवलराम काळे, जि. प. सदस्य वासंती मंगरोळे, दयाराम काळे, कैलास आवारे, व ३० आदिवासी पदाधिकाऱ्यांनी पुनर्वसित आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी असल्याचे सांगून आदिवासींना दिला. शनिवारी दुपारी चार वाजता पुनर्वसितांशी चर्चा करीत त्यांना आरोग्यासह मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी शासन-प्रशासनाची आहे. त्यांचे वाहन आतमध्ये नेऊ दिल्या जात नाही, बोअरवेलला सील लावून ठेवले आहे, उघड्यावर त्यांचा संसाराचा गाडा सुरू आहे. अशात शासन आणि प्रशासन केवळ गप्पा हाकून त्यांना आश्वासनाचे गाजर देत असल्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे. जंगलात हिंस्त्र प्राण्यांपासून आदिवासींच्या जिविताला धोका आहे. त्यांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास शासन-प्रशासन त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असून काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे. कुणालाच यात सोडणार नसल्याचा गंभीर इशारा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला.तीन बिबट्यांचे दर्शनमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित परिसरातील जंगलात आदिवासींचे आपल्या मूळ गावी आंदोलन सुरू असताना त्यांची विचारपूस आणि भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसजनांना रस्त्याने येताना तीन बिबट्याने दर्शन दिल्याचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले.सातबारा आणा तेव्हा बघू२५ डिसेंबर रोजी आपल्या मूळगावी परतलेले आदिवासी मागील २२ दिवसांपासून आंदोलन करीत आहे. त्यांच्या पालीच्या झोपडीत एक महात्मा गांधींचा फोटो लावला असून कुठल्याच प्रकारचे उग्र आंदोलन न करता गांधीगिरीचा अंत पाहू नका, सातबारा आणा शेतात घर बांधून द्या मगच येथून उठू अन्यथा येथेच अखेरचा श्वास घेण्याचा गर्भीत इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.
जीविताचे बरे-वाईट झाल्यास याद राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:47 PM
पुनर्वसित आठही गावांत आदिवासींचे आंदोलन सुरूच आहे. एकही आदिवासी जंगलाबाहेर निघाला नाही, सत्ताधाऱ्यांचे थापा मारणे बंद करून त्यांच्या हातात सातबारा द्या आणि तेथे घर बांधून द्या,...
ठळक मुद्देबबलू देशमुख : जिल्ह्यातील काँग्रेसजन आदिवासींच्या भेटीला