बच्चू कडू आक्रमक : बँक व्यवस्थापकांना इशारालोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शासनातर्फे शेतकऱ्यांना देण्यात येणारे १० हजार रुपये पीककर्जातून संबंधित बँक कुठल्याच प्रकारची कपात न करता शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याचे निर्देश अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता येथील उपविभागीय कार्यालयात आयोजित बँक व्यवस्थापकांच्या बैठकीत दिले.यावेळी तहसीलदार निर्भय जैन, उपनिबंधक विजय पांडे, प्रहारचे विजय थावानी, बन्टी उपाध्याय, गजानन मोरे, अंकुश जवंजाळ, दिलीप शेळके, राजा तट्टे, तात्पुरती मदत म्हणून शेतकऱ्यांना १० हजार रूपये पीककर्ज देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी पीककर्ज मिळण्याच्या आशेने बँकेत चकरा मारत आहेत. मात्र नेहमीप्रमाणे बँका शेतकऱ्याची ससेहोलपट करण्यासोबत त्यांना कागदपत्रांसाठी नाहक त्रास देत असल्याचा अनुभव पाहता आ. बच्चू कडू यांनी आज बैठक घेतली.बँकांना लेखी आदेश नाहीशासनाने दहा हजार रूपये तात्पुरती मदत जाहीर केली असताना बँकांना लेखी स्वरुपात कुठल्याच प्रकारचे आदेश पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या याद्या व रक्कम आदीवर माहिती घेतली. मंगळवारी आदेश पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पीककर्जातून कपात केली तर याद राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:07 AM