ना. रणजित पाटलांची सीपींना ताकीद : अमरावतीत ‘स्मार्ट डिजिटल कंट्रोल रूम’गणेश देशमुख अमरावतीखूप झाले. हरएक जीव लाख मोलाचा आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अपघातात यापुढे कुणी मृत्युमुखी पडले तर याद राखा, अशा शब्दांत गृहराज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना सुनावले. ना.पाटील यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान सोमवारी 'लोकमत'शी खास बातचित केली. शहरातील अपघातांची आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची मालिका बघून ना.पाटील अस्वस्थ झाले होते. अलिकडेच इर्विन चौकात घडलेल्या ट्रक-दुचाकी अपघाताबाबत हळहळ व्यक्त करून ठोस, अचूक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे शहरातील काही अपघातबळी रोखता येणे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.प्रमुख रस्त्यांवर तिसरा डोळाअमरावती : शहर पोलीस दलप्रमुखाने यासंबंधीची जबाबदारी स्वीकारण्याचे कडक आदेश दिले आहेतच; तथापि गृहराज्यमंत्री यानात्याने शासकीय स्तरावर निर्णायक पाऊल उचलण्याची प्रक्रियादेखील आरंभली असल्याची माहिती ना.पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'डिजिटल इंडिया'च्या घोषणेला मूर्तरूप देताना वाहतूक नियंत्रण प्रभावशाली करण्यासाठी 'स्मार्ट डिजिटल कंट्रोल रूम'ची स्थापना अमरावती शहरात केली जाईल. यामाध्यमातून ई-चालान, ई-पेमेंट आणि 'रियलटाईम पिक्चर' ही कार्यप्रणाली अमलात येईल. कारभार पूर्णत: पारदर्शक होईल. वाहनाच्या नंबर प्लेटवरील क्रमांक दिसू शकेल, अशा गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमेरे आता उपलब्ध झाले आहेत.मुंबईत तसे कॅमेरे वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. अमरावती शहरातील प्रमुख रस्त्यांवर असे कॅमेरे लावले जातील.महानगरपालिकेचे त्यासाठी सहकार्य घेतले जाईल. 'हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यां'मुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे 'रियल टाईमफोटोग्राफ' वाहतूक शाखेकडे उपलब्ध असतील.मी नियम मोडलाच नाही, असे म्हणणाऱ्यांना नियम मोडल्याचा पुरावाच कारवाईच्या पुष्ट्यार्थ देता येईल. पोलिसांवरही नजरया कॅमेऱ्यांमुळे वाहतूक पोलिसांवरही नजर ठेवली जाईल. ज्यांनी कामात कुचराई केली, ते पकडले जातील. ई-चलान पद्धती अंमलात आणल्यामुळे प्रत्यक्ष काय घडले, चालान कुठल्या कारणासाठी फाडले, फाडलेले चालान रद्द केले की कसे, आदी मुद्यांबाबत सर्व पुरावे उपलब्ध होतील. ही व्यवस्था उभारताना प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीचे ध्येयदेखील ठेवण्यात आल्याची माहिती ना.पाटील यांनी दिली. गरज पडल्यास ‘अॅप’ निर्मिती !वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी डिजिटायजेशन प्रणाली उभारण्यासाठी सलग तीन बैठकींनंतर निर्णायक प्राथमिक बैठकही पार पडली. गरज भासल्यास शासनाच्यावतीने यासंबंधिचे अॅप्लिकेशन तयार केले जाईल. विशेष प्रयत्न करून अर्थसंकल्पात त्यासाठी तरतुदही केली जाईल, अशी तयारीही ना.पाटील यांनी बोलून दाखविली.
अपघात बळी गेल्यास याद राखा !
By admin | Published: March 21, 2017 12:12 AM