निवडणूक आली की, रामाची आठवण; बाकी दिवस वनवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 01:01 AM2019-02-08T01:01:44+5:302019-02-08T01:02:35+5:30

देशातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महागाई उच्चांक गाठत आहे. निवडणूक आली की, रामाची आठवण येते आणि नंतर त्याला वनवासात पाठविणार; असे हे सरकार घालण्याशिवाय पर्याय नाही. खोटे आश्वासन देणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 Remember that Ramna was there; The rest of the days in the dungeon | निवडणूक आली की, रामाची आठवण; बाकी दिवस वनवासात

निवडणूक आली की, रामाची आठवण; बाकी दिवस वनवासात

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीचा ‘निर्धार परिवर्तनाचा’ : अचलपूर-परतवाड्यातील सभेला हजारोंची उपस्थिती

परतवाडा : देशातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. महागाई उच्चांक गाठत आहे. निवडणूक आली की, रामाची आठवण येते आणि नंतर त्याला वनवासात पाठविणार; असे हे सरकार घालण्याशिवाय पर्याय नाही. खोटे आश्वासन देणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ असल्याचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात बुधवारी दुपारी २ वाजता आयोजित सभेला अजित पवार यांना संबोधित केले. विदर्भा$चे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना पाच वर्षांपासून सर्व प्रकल्प रखडले आहेत. नोटबंदीने १ कोटी २० लाख नोकºया घालवल्या. जीएसटीने व्यापारी परेशान झाला आहे. ‘नको हे अच्छे दिन’ म्हणायची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे, असा संताप पवार यांनी व्यक्त केला.
मंचावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पक्षनिरीक्षक अरुण गुजराथी, अनिल देशमुख, आ. प्रकाश गजभिये, सुरेखा ठाकरे, शरद तसरे, वसंत घुईखेडकर, संदीप बाजोरिया, विजय काळे, संगीता ठाकरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, देवेंद्र पेटकर, सुनील वºहाडे, निखिल ठाकरे, बाजार समितीचे सभापती अजय टवलारकर, अरुण गावंडे, अजय अग्रवाल, नानू जयसिंग, धीरज निंभोरकर, ऋषीकेश बारब्दे, सल्लूभाई, ख्वाजा बेग, प्रथमेश ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी तीन दिवसांतच सभेचे नियोजन केल्याबद्दल सुरेखा ठाकरे यांचे कौतुक केले. संचालन प्रदीप राऊत यांनी केले.
आपण मुंबईत भाजीपाला जिथे विकत होतो, ती जागा आजही कायम आहे. मात्र, नरेंद्र मोदी जिथे चहा विकत होते, ते रेल्वे स्टेशन कुठे गायब झाले, हा संशोधनाचा विषय असल्याचे सर्वात शेवटी भाषण करणारे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले. पेट्रोलचे भाव भडकल्याने ते उद्या एका कुपीत मिळेल आणि त्याचे नामकरण झालेले दिसेल ‘पंडित दीनदयाल तरल पदार्थ’. त्याचे आश्चर्य मानू नका, असे म्हणत त्यांनी सभेत हशा पिकविला.

Web Title:  Remember that Ramna was there; The rest of the days in the dungeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.