शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

विमानाच्या तिकिटाआधी पासपाेर्ट काढा; 25 ते 30 दिवसांचे वेटिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 11:51 PM

पासपोर्ट नसल्यास व्हिसासुद्धा मिळत नाही. पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून परदेशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रीतसर परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे अर्ज करावा लागतो. आता ही सुविधा आपल्या शहरातील मुख्य टपाल कार्यालयातसुद्धा उपलब्ध झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदेशी प्रवासासाठी पासपोर्ट  हा महत्त्वाचा दस्तऐवज  आहे. व्हिसा काढायचा असल्यास पासपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पासपोर्ट नसल्यास व्हिसासुद्धा मिळत नाही. पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून परदेशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रीतसर परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार खात्याकडे अर्ज करावा लागतो. आता ही सुविधा आपल्या शहरातील मुख्य टपाल कार्यालयातसुद्धा उपलब्ध झाली आहे. नव्या प्रणाली अंतर्गत आभासी अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांना पावती आणि मूळ कागदपत्रांसह सेवा केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. पारपत्रासाठी अर्ज जमा केल्यानंतर १५ दिवसांपर्यंत आपल्या भागातल्या स्थानिक पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येतो. 

पासपोर्टसाठी अर्ज कसा कराल?पासपोर्टसाठी पारपत्र विभागाच्या संकेतस्थळावर  माहिती भरून, त्यावर मिळणारा आयडी घेऊन जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात जावे लागते. यानंतर यकागदपत्रांची तपासणी केली जाते. 

कागदपत्रे काय लागतात?पासपोर्ट काढण्याकरीता  आधारकार्ड, जन्मतारखेचा दाखला, बँक पासबुक (राष्ट्रीयीकृत बँक), शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, महिलांकरिता लग्न झाल्याचे प्रमाणपत्र ही कागदपत्र लागतात. या आधारेच पासपोर्ट निघतो. 

डाक कार्यालयात दोन काऊंटरजिल्हा डाक कार्यालयात पासपोर्ट सेवेसाठी दोन काऊंटर उघडण्यात आले आहेत. या काऊंटरवर पासपोर्टसंबंधित जिल्हाभरातील लोकांना सेवा दिली जाते. या ठिकाणी दररोज अनेकजणांच्या कागदपत्रांची पडताळणी होते.

दररोज ५० जणांचा निपटारा

- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जिल्हा डाक कार्यालयातील पासपाेर्ट काऊंटरवर कागदपत्र पडताळणीकरिता बोलवतात. - दररोज साधारण ४५ ते ५० अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून अर्जांचा निपटारा केला जातो.

शुल्क किती?पासपोर्ट साठी ४५ दिवस, तर तत्काळ पारपत्र सात दिवसांमध्ये मिळते.यासाठी  १,५०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. वय हे ६०पेक्षा जास्त असेल, तर त्याकरिता १,३५० रुपये इतका खर्च लागतो. तत्काळ पासपोर्टकरिता २,००० ते ४,००० रुपयांचे शुल्क लागते.

जिल्हा डाक कार्यालयात पासपोर्टकरिता दोन काऊंटर उपलब्ध आहेत. या ठिकाणी दररोज अनेक अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. आता नागपूरला जाण्याची आवश्यकता नाही.            

 - चांद शाह, पोस्टल असिस्टंट, डाक विभाग

 

टॅग्स :passportपासपोर्ट