लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील प्रमुख चौकांमध्ये असणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत साहित्य जप्त केले. शनिवारी गांधी चौक, राजकमल चौक आदी भागात मोहीम राबविण्यात आली.योगेश कोल्हे यांच्या पथकाने शहरातील मालवीय चौक, कॉटन मार्केट, चित्रा चौक, इतवारा बाजार, परिसरातील दुकानदारांनी भाजीपाला, लोखंड साहित्य, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने रस्त्यावरील फुटपाथ मोकळे करण्याची कारवाई करण्यात आली.यासोबतच गांधी चौक, राजकमल चौक, नगर वाचनालय, बापट चौक, सरोज चौक, जयस्तंभ, चौक आदी भागातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढण्यात येवून हातगाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान हातगाड्या, लोखंडी खोके, लोखंडी खोके, स्टंड, आदी दोन टेबल साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये विनोद गेडाम, भारत बघेल, यासह इतरांचा सहभाग होता.लॉकडाऊन-४ च्या श्थििलतेनंतर महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण विभागाच्या कारवाया थंडावल्याने शहरातील चौकाचौकांत अतिक्रमण वाढले होते. मात्र, दोन दिवसांत या मोहिमेने वेग घेतला आहे.त्यानूसार शुक्रवारीदेखील शहर वाहतुक पोलीस शाखेचे प्रमुख, पोलीस निरीक्षक अश्विन महाजन यांच्यासह योगेस कोल्हे यांच्या पथकाने राजकमल चौक, गांधीचौक, नगर वाचनालय, बापट चौक, सरोज चौक, जयस्तंभ चौकात कारवाई केली होती. याशिवाय राजापेठ पोलीस स्टेश्न ते राजापेठ चौक, समर्थ हायस्कल परिसर, रुख्मिनीनगर, शिवटेकडी परिसर, पोलीस पेट्रोलपंप परिसर आदी भागात धडक कारवाई करुन हातगाडया, कापडाचे गठ्ठे, नारळ, आदी साहित्य जप्त केले होते. या कारवाई दरम्यान किमान दोन ट्रक साहित्य पथकाने जप्त केले. सकाळपासून सुरु झालेलय या कारवाईमध्ये शहर पोलिसांसह महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरात प्रमुख चौकातील अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरातील प्रमुख चौकांमध्ये असणाऱ्या अतिक्रमणावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत साहित्य जप्त केले. शनिवारी गांधी ...
ठळक मुद्देपथकाची कारवाई । राजकमल, बापट चौक भागात मोहीम