राज्य बैठकीत अनिल बोंडे यांचे मत : समन्वय समितीच्या अहवालाची चौकशी कराधामणगाव रेल्वे : तांत्रिकपदाचा दर्जा, स्वतंत्र संवर्ग तसेच तृतीय श्रेणीची वेतनश्रेणी असे ५१ पुरावे असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष करून प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रकार राज्यात घडला़ राज्यातील १५ हजार प्रयोगशाळा कर्मच्याऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांना तृतीय वर्गात घेण्यासाठी प्रयत्न करणार असून या कर्मचाऱ्यांचे आपण पालकत्व स्वीकारले असल्याचे मत प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे नवनियुक्त राज्यध्यक्ष आ़अनिल बोंडे यांनी व्यक्त केले़राज्यातील सर्व विभागांतील विभागप्रमुख तसेच राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची राज्य बैठक आ़अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी अमरावती येथील शिवाजी शिक्षण महाविद्यालयात पार पडली. यावेळी राज्य सचिव भरत जगताप, भातकुली येथील अनुदानित आश्रम शाळांच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे, अमरावती विभागाचे अध्यक्ष नंदकिशोर राऊत, नंदलाल डागा, विजयसिंग भोर, पांडुरंग काकडे, दिलीप कोहळे, प्रभाकर गायकवाड, शिंदे, आखरे, तसेच राज्य कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते़ प्रयोगशाळा परिचर हे स्वतंत्र सवंर्गाचे पद आहे़ त्यांना मागील अनेक वर्षांपासून तृतीय वर्गाची वेतन श्रेणी आहे़ परंतु चतुर्थ कर्मचाऱ्यांत या पदाची गणना शिक्षण विभाग करीत आहे़ अनेक वर्षांपासून स्वतंत्रपणे अस्तित्व असलेल्या या पदाला संपुष्टात आणण्याचे काम मागील सरकारने केले आहे़ २३ आॅक्टोबर २०१३ रोजी शासकीय अध्यादेश काढून या पदाला अतिरिक्त म्हणून केले़ शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून समन्वय समितीची स्थापना केली़ समितीचा अहवाल शासन दरबारी देताना शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि दुसऱ्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा समन्वय समितीचा अहवालच बदलून पुन्हा या कर्मचाऱ्यांवर अन्यायाची परिसीमाच ओलांडली आहे़ समितीच्या अहवालाची चौकशी करण्यासाठी आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे़ प्रयोगशाळा परिचरांना तृतीय वर्गाचा दर्जा मिळवून देणे, ज्या ठिकाणी कार्यरत आहे़ त्याच ठिकाणी सेवा निवृत्ती पर्यंत कायम ठेवणे अशा विवीध मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण पालकत्व स्वीकारले असल्याचे आ़ अनिल बोेंडे यांनी सांंगितले़संघटनेचे विस्तारीकरण व आजपर्यंत शासनाकडे प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्याबाबतच्या अहवालाचे वाचन राज्य सचिव भरत जगताप यांनी केले. संगीता शिंदे, प्रभाकर गायकवाड, चव्हाण यांनी आपले मते मांडले़ राज्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव आ़बोंडे, भरत जगताप यांनी केला़ बैठकीला अमरावती, नागपूर, पूणे, कोल्हापूर, नाशिक, औरगाबाद, कोकण, मुंबई या विभागातील विभागीय अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी उपस्थित होते़ प्रास्ताविक दिलीप कोहळे तर आभार प्रदर्शन विभागीय सचिव सुनील वानखडे तर संचालन मनीषा देशमुख यांनी केले राज्य बैठकीकरिता जिल्हाध्यक्ष प्रवीण गायकवाड, गणेश परळकर, गजानन सोनवणे, नितीन पोटे, मिलिंद तायडे, अनिल बरडे, हेमंत शर्मा, सहदेव सोळंके, वळतकर, आत्मानंद नाकाडे, दिनेश टोकसे यांनी अथक परिश्रम घेतले़ (तालुका प्रतिनिधी)
प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करणार
By admin | Published: September 01, 2015 12:10 AM