अंजनगाव सुर्जी : येथे लसीकरण करण्यासाठी झालेली गर्दी पाहता येथील ग्रामीण रूग्णालय कोरोनाचा हॉटस्पॉट बनणार की काय, अशी भूती व्यक्त केली जात आहे. लस घेण्यासाठी पहाटे पाचपासून लोक ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत आहेत. त्यात अनेक नागरिक विनामास्क होते, तर कोणीही शारीरिक विलगीकरणाचे भान ठेवून नव्हते. लस मिळण्याच्या नादात नागरिकांनी सर्व रुग्णालय परिसरातच गर्दी केली. मात्र, १०० लसी उपलब्ध असताना त्यासाठी पाचशेपेक्षा अधिक लोकांची झालेली गर्दी कोरोना नियमावलीचे वाभाडे काढणारी ठरली.
अंजनगाव तालुक्यासाठी ९०० लसी प्राप्त झाल्या होत्या. ज्यापैकी ३०० लसी शहरासाठी व अन्य शहरातील चार खेड्यांमध्ये दिल्या होत्या. अंजनगाव शहरासाठी मात्र दुसरा डोज असणाऱ्यांसाठीच त्या वापरण्यात आल्या. दुसरा डोज असणाऱ्या कोव्हॅक्सिनच्या लाभार्थांसाठीच लस उपलब्ध होती. गर्दीमुळे नियोजन बिघडले. मात्र, लसीकरण व्यवस्थित पार पडले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी सुधीर डोंगरे यांनी दिली.
--------