शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
2
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
3
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
4
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग
5
काय असतं प्री अप्रुव्ह्ड लोन? सामान्य कर्जापेक्षा कमी असतो का व्याजदर? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या
6
"निवडणूक आयोग कुत्रा बनून मोदींच्या दारात बसलाय’’, टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली
7
Post Office Investment : पोस्टाची 'ही' स्कीम तुम्हाला करेल मालामाल, केवळ ५ हजारांची गुंतवणूक; काही वर्षांत बनाल लखपती
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
9
श्रद्धा-अर्जुन कपूरला एकत्र पाहून चाहत्यांना आठवला 'हाफ गर्लफ्रेंड', म्हणाले, "दोघं पुन्हा..."
10
महाराष्ट्रात जे उपमुख्यमंत्री बनलेत, ते कधीच...; देवेंद्र फडणवीस कुणालाही न जमलेली किमया साधणार?
11
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
12
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
13
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
15
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
16
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
17
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
18
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
19
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
20
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण

छिंदमविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:13 PM

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलणारा रा.स्व. संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा अहमदनगर येथील उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व सरसंघचालकांसह भाजपने या प्रकारासाठी देशाची माफी मागावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व पक्ष व संघटनांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देसंघ-भाजपने मागावी जाहीर माफी : छत्रपतींच्या अवमाननेविरुद्ध सर्वपक्षीय एकजूट

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलणारा रा.स्व. संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा अहमदनगर येथील उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व सरसंघचालकांसह भाजपने या प्रकारासाठी देशाची माफी मागावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व पक्ष व संघटनांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत व भाजपविरोधात तीव्र निदर्शने व घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. यामध्ये जिल्हा, शहर व युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सकल मराठा समाज, संभाजी बिग्रेड, जिजाऊ बिग्रेड, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, युवा स्वाभिमान, एनएसयूआय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आयएमए, छत्रपती संघटना, छावा संघटना, भीम आर्मीसह अन्य संघटनांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन दिले. छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, त्याला पदावरून तत्काळ काढा, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखविल्याबाबत सरसंघचालक मोहन भागवत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी, अन्यथा परिणामास तयार राहा, असा इशारा यावेळी देण्यात आला. सर्वांच्या भावना व मागणी शासनाला कळवीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हाभरात निषेध, निदर्शने, पोलिसांत तक्रारीनिषेधाने गाजला दिवस : अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदमविरुद्ध रोष, राजकीय पक्षांसह विविध संघटना रस्त्यावरउपमहापौर छिंदम याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणऱ्या सर्वपक्ष- संघटनांच्या पदाधिकाºयांमध्ये प्रल्हाद ठाकरे, सुरेखा ठाकरे, सुनिल वऱ्हाडे, किशोर बोरकर, राजेंद्र महल्ले, हरिभाऊ मोहोड, भाषकर ठाकरे, नितीन देशमुख, अनिकेत देशमुख, वैभव वानखडे, नितीन गुडधे, मयुरा देशमुख, अरविंद गावंडे, अमोल देशमुख, श्याम धाने, रुपेश सवाई, सागर देशमुख, पंकज मेश्राम,राहूल माटोडे, अमोल निस्ताने, आकाश टेकाडे, अंबादास काचोडे, निखिल ठाकरे, मोरेश्वर देशमुख,राहूल पाटील, विशाल पवार, प्रफुल्ल देशमुख,राजा बांगडे, संकेत कुलट, मंथन साबळे, गाले, प्रद्युम्न पाटील,पूर्णा बोरसे, प्रवीण ढोमणे, आशिष ठाकरे, अभिजित देशमुख,यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अशा प्रवृत्ती देशाचे ऐक्य व सार्वजनिक स्वास्थ्यास धोकादायक असल्याने त्याला तत्काळ अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नोंदविली.रिपाइंतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनआॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदमविरुद्ध कठोरात कठोर गुन्हा नोंदवून शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने करण्यात आली. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना देण्यात आले. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले, करण गायकवाड, युवक शहराध्यक्ष उमेश इंगळे, सविता भटकर, कमल कांबळे, गौतम नाईक, नीलेश वानखडे, सुरेश तायडे, सुनील थोरात, मनोज थोरात, रवि जावरे, देविदास मोरे, बाबू मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.राष्ट्रवादीने वाहिल्या चपलाराष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा राजकमल चौकात निषेध नोंदविण्यात आला. शिवाजी महाराजांबाबत अपशब्द बोलल्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष उफाळून आला.राष्ट्रवादी शहराध्यक्ष राजू महल्ले, नितीन शेरेकर, युवक शहराध्यक्ष गुड्डू ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रायुकाँ कार्याध्यक्ष शुभम शेगोकार व विकास तांबसकर यांच्या नेतृत्वाखाली राजकमल चौकात श्रीपाद छिंदम यांच्या पुतळ्याला चपला वाहण्यात आल्या. यावेळी चेतन अडोकर, सूरज धानोरकर, महासचिव राम बुरघाटे, अभिजित धमार्ळे, भूषण अंबाडकर, विवेक टेकाडे, क्षितिज बोंडे, वैभव टेटू, वैभव झोले, श्याम ढोकणे, प्रेम हेले, सतीश ढोकणे, महेश सिडामे, नितीन अनासने, अभिजित पवार, चिन्मय केवले, यश पंधे, अभिजित भुस्कडे, सतीश झोपाटे, प्रफुल्ल काळे, आदित्य कान्हेकर, प्रणव ठाकरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गावर शिवसेनेचा चक्काजामअमरावती : शिवसेनेच्यावतीने शनिवारी सकाळी विद्यापीठाजवळील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भाजपच्या श्रीपाद छिंदमचा निषेध करण्यात आला.श्रीपाद छिंदमला अटक केली; मात्र तेवढीच शिक्षा पुरेशी नसल्याच्या प्रतिक्रिया याप्रसंगी उपस्थित पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. यावेळी उपशहरप्रमुख अमोल निस्ताने, माजी जिल्हाप्रमुख नाना नागमोते, राहुल माटोडे, मंगेश देशमुख, मंगेश गाले, वासुदेव अवसरे, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, शैलेंद्र डहाके, संजय बुंदीले, प्रशांत काळे, गुड्डु मिश्रा, रोहित चव्हाण, उमेश गोगटे, गोपाल ढोके, दीपक काळे, उमेश बोरकर, विक्की मुळे, प्रतीक डुकरे, नागेश वानखडे, आदित्य बोंडे, तुषार जगताप, तुषार वाइन्देशकर, राघव जगताप, प्रशांत कुळमेथे, पांडुरंग चावरे, चंकी तिवारी, राहुल अंभोरे, सुनील सोळंके, विनय पहाडन, मिलिंद बारबुद्धे, सूरज तिडके, अमित पांडे, छोटू इंगोले यांच्यासह विद्यापीठ शाखेचे अनेक शिवसैनिक सहभागी होते.भीम आर्मीने जाळला पुतळाअमरावती : शहरातील राजकमल चौकात श्रीपाद छिंदमचा प्रतीकारात्मक पुतळा जाळून भीम आर्मीने शनिवारी निषेध नोंदविला. कोतवाली पोलिसांनी बंटी रामटेके, अमोल इंगळे, गौतम हिरे, राजेश वानखडे, सचिन गवई व प्रवीण बनसोड यांना ताब्यात घेतले होते.