लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.तक्रारीनुसार, अवंतिका या प्रसूतीसाठी तीन महिन्यांपासून त्यांच्या माहेरी राहत होत्या. दरम्यान १० आॅक्टोबर रोजी अवंतिका यांना ताप आला. प्रसूतिपूर्व उपचार डॉ. शोभा पोटोडे यांच्याकडे घेत असल्याने त्यांना तेथे दाखल करण्यात आले. तेथे रक्त तपासणीअंती डेंग्यूचे निदान झाले. उपचारादरम्यान १३ आॅक्टोबर रोजी अवंतिकाची प्रसूती होऊन त्यांनी बाळाला जन्म दिला.महापालिकेचीच हलगर्जीबाळाचा जन्म हा तिला डेंग्यू असताना झाला. बाळाच्या जन्मानंतर अवंतिकाला रक्तचापाचा त्रास होऊ न त्यांची प्रकृती खालावली. डॉ. पोटोडे यांच्याकडे श्वसनयंत्रणा उपलब्ध नसल्याने अवंतिकाला डॉ. बोंडे यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले. बोंडे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असताना त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. अवंतिका यांचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे डॉ.शिरभाते यांनी स्पष्ट केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आई व बाळाने परस्परांना एकदाही न पाहता मातेचा मृत्यू झाला, असे रुदन तक्रारीतून करण्यात आले.महापालिकेच्या हालगर्जीपणामुळे परिसरात साफसफाई झाली नाही. रहिवाशांनी मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नैताम आणि नगरसेवकांना वारंवार विनंती केली; तथापि साफसफाई झाली नाही. साफसफाई न झाल्यामुळेच माझी पत्नी अवंतिका दगावली. त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी विनंती तक्रारीतून करण्यात आली आहे.तक्रार प्राप्त झाली; तथापि ती तक्रार आरोग्य विभागाशी संबंधित असल्याने पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या अभिप्रायानंतर गुन्हे दाखल करायचे की कसे, याबाबत निर्णय घेतला जाईल.- किशोर सूर्यवंशी,ठाणेदार, राजापेठ
सीमा नैतामांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:49 PM
पत्नी अवंतिकाच्या मृत्यूला महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नैताम या जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी तक्रार मृताचे पती अमोल इंगळे दोन्ही भाऊ सागर व सुमीत देशमुख यांनी राजरपेठ पोलिसांत नोंदविली.
ठळक मुद्देडेंग्यूने मृत्यू : मृताच्या कुटुंबीयांची राजापेठमध्ये तक्रार