गणेश देशमुख अमरावतीपालकमंत्रिपद ज्यासाठी मिळाले, ते सामान्यांच्या तक्रार निवारणाचे कार्य अतिजलद गतीने व्हावे, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी 'इन्फरमेशन अॅन्ड टेक्नॉलॉजी' (आयटी), 'सोशल मिडिया' आणि 'टेलिकॉम्युनिकेशन'चा खुबीने वापर केला आहे. टेक्नोसेवी पालकमंत्री अमरावती : या विविध तंत्रज्ञानाद्वारे तक्रारनिवारण आणि लोकाभिमूख कारभारावर भर देणारे ना. पोटे पाटील हे मंत्रिमंडळ सदस्यांमध्ये अग्रस्थानी ठरले आहेत. ना. पोटे पाटील यांनी 'व्हॉट्स अॅप', 'फेसबुक', 'अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप' आणि 'इंटिग्रेटेड व्हॉईस रेकॉर्डिंग सिस्टम' या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी २४ तास तक्रार स्वीकारण्यासाठीचे 'आॅनलाईन' दालनच उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांना तक्रारींशिवाय त्यांची मते, सूचना आणि विचारही या सेवांमार्फत पालकमंत्र्यांपर्यंत अर्थात शासनापर्यंत पोहोचविण्याची संधी आहे. ७४ हजार नागरिकांशी थेट संवाद४ना.पोटे यांनी आतापर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांशी प्रत्यक्षरित्या संवाद साधला आहे. अमरावतीत असताना विश्रामगृहात ते अधिकाधिक लोकांना भेटतात. जनसंपर्काचा हा धडाका असाच सुरू राहिल्यास सर्वाधिक लोकांना भेटणारे पहिले पालकमंत्री, असा नवा विक्रमच त्यांच्या नावे प्रस्थापित होऊ शकेल. तक्रारींसाठी हे आहेत क्रमांकव्हॉटस अॅप८३७८०८९०००टेलिसचिवालय९२२५५११०००
तक्रार द्यायचीय? फोनवर सांगा, व्हॉट्सअॅपवर पाठवा!
By admin | Published: January 21, 2016 12:38 AM