लॉकडाऊनचा फटका सर्वसाधारण कामगार यांना बसला आहे. यासोबतच जे निराधार आहेत, अपंग आहेत, अशांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने रेशनमार्फत मोफत धान्य देणार असल्याचे जाहीर केले असले तरी खऱ्या गरजूंना आजच धान्य, किराणाची आवश्यकता आहे. अनेक ग्रामपंचायतींनी अपंगांसाठी असलेल्या ५ टक्के निधींचे वाटप मार्च महिना झाल्यानंतरही केलेले नाही. त्यांना तातडीने अपंगांच्या निधी वाटपाचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी तिवसा तालुका महिला सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्ष कविता मनोहर यांनी केली आहे.
अपंग, निराधार व्यक्तींकडून धान्य, किराणा मदतीची याचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:13 AM