अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित दंत महाविद्यालय व रुग्णालयात ३० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या संशोधन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अमरावती शहरातील न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड रिसर्च या संस्थाद्वारे शिबिर घेण्यात आले. यात संशोधनाबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. डॉक्टर व विद्यार्थ्यांना होणाऱ्या लाभासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर व विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास शोधपत्रिकेत प्रकाशित केल्यामुळे त्या संशोधनाचा उर्वरित डॉक्टर व पदवी घेत असलेल्या विद्यार्थांना किती लाभ मिळू शकतो, याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे आयोजन दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश गोंधळेकर यांनी केले. प्रपाठक डॉ. केतकी काळेले-भोकरे यांच्या न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड रिसर्चतर्फे आशिष तरार यांनी वरिष्ठ दंतचिकित्सक व विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी सर्व दंतचिकित्सक व विद्यार्थी उपस्थित होते.