अमरावती : शहर विकासासाठी समितीने ९१ भूखंडांवरील आरक्षण हटिवल्याचा आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी बुधवारी पत्रपिरषदेत केला. त्याच्या चौकशीसाठी आपण इडीकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर विकास आराखड्याकरिता नियुक्त समितीने शासनाला जो अहवाल दिला, त्यात ६३ भूखंडांवरील आरक्षण हटविल्याचे राठोड म्हणाले. हा अहवाल त्यापूर्वी महापालिकेच्या आमसभेसमोर ठेवण्यात आला होता. त्यावर सभागृहाचे आक्षेप घेण्यात आल्यानंतर आमसभेने चौकशीसाठी एक समिती नियुक्त केली. या समितीने पुन्हा २८ भूखंडांवरील आरक्षण हटविले, असे एकूण ९१ भूखंडांवरील आरक्षण गैरकायदेशिररीत्या हटविल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाने नियुक्त केलेल्या समितीत महापौर चेतन गावंडे यांच्यासह अन्य पाच सदस्य होते. आमसभेत आक्षेप आल्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेते व ज्येष्ठ नगरसेवकांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीवरही आरोप घेण्यात आले. या भूखंड घोटाळ्याची तक्रार सर्व शासकीय पातळीवर केलेली आहे. त्याची दखल न घेतल्याने आता ईडीकडे तक्रार करणार असल्याचे राठोड म्हणाले.