मागणी : शहर काँग्रेस कमिटीचे निवेदनअमरावती : पुरोगामी विचार सरणीच्या व शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला तसेच मराठा समाजाला नोकरी व शैक्षणिक सवलतीसाठी मागील कित्येक वर्षांपासून होत आहे. याबाबत आघाडी सरकारने आरक्षण देण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र सध्याच्या भाजपा-शिवसेना सरकारने यासंदर्भात उदासीन असल्याने याविरोधात मंगळवारी शहर काँगे्रस कमिटी व महापालिकेतील काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाज उपेक्षित असून शिक्षणाच्या बाबतही हा समाज मागासलेला आहे. यासोबत मराठा समाज शैक्षणिक व रोजगाराच्या बाबतीत पिछाडीवर आहे. मुस्लिम समाजाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधायची असेल तर आरक्षण लागू करण्यात यावे, तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची एकमुखी मागणी शहर काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय अकर्ते, महापालिकेतील पक्षनेता बबलू शेखावत, स्थायीचे सभापती विलास इंगोले, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर बोरकर, मुजफ्फर मामू, जियाभाई, फिरोज, गुड्डू मास्टर, समीर जवंजाळ, अक्षय भुयार, बबलू बोबडे, राजा बांगडे, ऋषी मेटकर, सागर देशमुख, देवेंद्र पोहोकार, हमीद शद्दा, अरुण जयस्वाल आदी उपस्थित होते.
मुस्लिम, मराठा समाजाला आरक्षण द्या
By admin | Published: September 02, 2015 12:12 AM