शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
2
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
3
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
4
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
5
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
6
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
7
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
8
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
9
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
10
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
11
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
12
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
13
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा
14
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
15
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
16
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
17
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
18
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
19
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल

झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांकडे धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत ३० सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने काढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.  यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण  महिलेसाठी  राखीव आहे. त्यामुळे आता नवी चेहऱ्यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विविध जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता, ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का, याकडे ग्रामीण भागातील मतदाराचं लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या घरातील वारस या पदासाठी दावेदार असू शकतो का? सर्वसामान्य महिला कार्यकर्तीला संधी मिळणार आहे. येणारा काळ ठरविणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आता चुरस वाढणार आहे.

आतापर्यंत पाच महिलांनी सहावेळा भूषविले अध्यक्षपदजिल्हा परिषदेच्या १९६२ ते मार्च २०२२ या कार्यकाळात ३१ अध्यक्ष मिळाले. यापैकी पाच महिला सलग अध्यक्ष झाल्या. यात सन १९९४ ते ९५ पर्यंत  सुमन सरोदे यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा कामकाज सांभाळले. त्यानंतर १९९७-९८ मध्ये उषा बेठेकर, १९९९ ते २००० मध्ये विद्या वाटाणे, सन २००० ते २००२ पर्यंत सुरेखा ठाकरे, २००५ ते २००७ पर्यंत उषा उताणे आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत सुरेखा ठाकरे यांनी अध्यक्षपद भूषविले. यात सुरेखा ठाकरे यांना दोनदा अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. २०१४ नंतर आता आगामी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला मिळणार आहे. त्या झेडपीच्या महिलांपैकी सातव्या अध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात ३२ व्या क्रमाचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत.

२००२ ते २०२० पर्यंत अध्यक्षपद असे होते राखीव    २००२-सर्वसाधारण    २००५- सर्वसाधारण महिला    २००७-सर्वसाधारण    २००९- सर्वसाधारण    २०१२- सर्वसाधारण महिला    २०१५-अनुसूचित जमाती    २०१७- अनुसूचित जाती    २०२० - ना.मा.प्र.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद