वरूड येथील घटना : पोलीस करणार प्रकरणाचा तपासवरूड : स्थानिक पांढुर्णा चौकातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन नागपूरच्या दिशेने पळून नेल्याची घटना १७ आॅगष्ट रोजी घडली. अपहरणकर्त्यांनी कार थांबवून लघुशंकेला उतरल्याची संधी साधून प्रतीकने कारमधून पळ काढला. अखेर रात्री १२ वाजतादरम्यान आडमार्गाने सीताबर्डी ठाण्यात पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. परंतु या घटनेमुळे शहरात खळबळ माजली होती. नागपूरच्या पोलिसांनी या बालकाला आईवडीलाच्या त्याब्यात दिले. घटनेविषयी शंका व्यक्त करुन उलटसुलट चर्चा होत असल्याने वरुड पोलीस घटनेचा तपास करणार असल्याचे सांगितले. स्थानिक न्यू.इंग्लिश हायर सेकंडरी स्कुलमध्ये १० व्या वर्गात शिकणारा प्रतिक जनार्दन खिरेकर हा भाडेकरु असलेल्या म्हातारीचा डोळे तपासणीसाठी डॉ.शर्मा यांच्या रुग्णालयात सोमवारी सकाळी १० वाजता गेला होता. तो घरी परतताना एका लाल रंगाच्या हुंडाई कपंनीच्या कारमध्ये बसलेल्या एका युवकाने गाडीत बस आम्ही सोडून देतो, असे म्हणून कारमध्ये जबरीने कारमध्ये बसविले, असे प्रतीकने सांगितले. रस्त्याने जातांना सुध्दा सदर युवक आपसात बोलताना एकमेकांची नावे घेताना इक्बाल, गण्या, मंग्या असे बोलत होते आणि शिवीगाळ करुन दारु पीत होते. तेव्हा नेमकी संधी साधून प्रतिकने गाडीची चावी शोधली आणि दरवाजा उघडला. त्यांची नजर चूकवून वाहनाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये लपला. यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. एका व्यक्तीला रडताना दिसल्याने याला सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहचविले.त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. नागपूर पोलिसांनी पहाटे दीड वाजता आईवडीलांना दुरध्वनीवरुन प्रतीकची माहिती देवून सकाळी ठाण्यात बोलविले व त्यांचे बयाण नोंदवून प्रतीकला त्यांच्या सुपूर्द केले. मात्र सीताबर्डी पोलिसांनी घटनेत कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. या घटनेविषयी वरूड शहरात चर्चा होत आहे. प्रकरणात वरूड व नागपूर येथे तक्रार दाखल नाही. गुन्हा दाखल नाही. यामुळे चर्चेला पेव फुटले आहे. या घटनेबाबत शंका- कुशंका व्यक्त होत असल्याने अपहरण प्रकरणात नेमके काय घडले याचा तपास करण्याकरिता वरुड पोलिसांचे पथक नागपूर जिल्हयातील घटनास्थळावर जाणार आहे. यानंतरच सत्य काय ते पुढे येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)नागपुरात बयाण नोंदविले, गुन्हा दाखल नाही !प्रतीक खिरेकर नामक १५ वर्षीय मुलाचे वरूडातून चार युवकांनी अपहरण केले होते. परंतु सदर मुलाच्या समयसूचकतेमुळे पळून जाऊन बर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला आईवडीलाच्या स्वाधीन केले. एवढी मोठी घटना असताना बालकांच्या माहितीवरून पोलिसांनी बयाण नोंदविण्यापलीकडे कोणतेही गुन्हे दाखल केले नाही, हे विशेष.आई-वडिलांसह नातेवाईकांचा जीव भांड्यातवरुडचा अपहृत बालक प्रतीक नागपुरातील बर्डी ठाण्यात आला यावेळी त्याला जेवण दिले. आईवडिलांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. अखेर त्याचे धाडस आणि पोलिसांच्या सतर्कमुळे प्रतीक घरी सुखरुप पोहोचला. अखेर प्रतीकचा शोध लागल्याने त्याच्या नातेवाईकांसह आईवडिलांचा जीव भांड्यात पडला.
अपहरण झालेल्या प्रतीकची स्वत:च्या धाडसानेच सुटका
By admin | Published: August 21, 2015 12:42 AM