पर्यावरण संतूलन गरजेचे : विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांची माहितीअमरावती : विभागात १५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीस जनआंदोलनाचे स्वरुप येण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी रोपटे लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन विभागीय आयुक्त राजूरकर यांनी केले आहे.समाजातील प्रत्येक घटक, संस्था, व्यक्ती, राजकीय पक्ष व सर्वांनीच या वृक्ष लागवडीत सहभाग द्यावा. पर्यावरणाचा संतूलन राखण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात वनमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने विभागातील सर्वच जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवसी २ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहेव यामध्ये विभागात १५ लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकी घेण्यात आलेल्या आहेत व जिल्हास्तर समितीचे गठन करण्यात आले आहे. दर मंगळवारी या समितीची बैठक घेऊन आढावा घेण्यात येतो. तसेच तालुकास्तरावर दर सोमवारी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकी घेण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.प्रत्येक शासकीय कार्यालयांनी त्यांना निर्धारीत केलेल्या लक्ष्यानुसार रोपांची मागणी नोंदविली आहे. वृृक्षारोपण झाल्यानंतर प्रत्येक झाडाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. किती झाडे लावली, किती जगली याची कारणमिमांसा करण्यात येणार आहे. या वृक्षलागवड महोत्सवात बीडीओंचा महत्त्वाचा वाटा राहणार आहे. शाळा, रस्ते, नदी-नाले, जलयुक्त शिवार कामांचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र यासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तसेच मोकळ्या व पडीक शासकीय जागेवर ही वृक्षलागवड करण्यात येईल. शेताच्या बांधावरदेखील वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची माहिती राजूरकर यांनी दिली. वृक्षलागवडीत या विभागाचा सहभागया वृक्षलागवडीमध्ये जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय, महापालिका, सहसंचालक तंत्रशिक्षण, आरटीओ, शिक्षणाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जलसंपदा विभाग, विद्युत विभाग, आरोग्य, समाज कल्याण, जिल्हा माहिती कार्यालय, कृषी विभाग आदी विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक गटास २०० वृक्षलागवडीचे ‘लक्ष्य’वृक्षलागवडीमध्ये ५ ते ७ फूट उंचीची व दीर्घायुषी असणारी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या झाडांमुळे सावली मिळते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. प्रत्येक गावात ३० गट तयार करण्यात आली आहेत व प्रत्येक गटास २०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
विभागात १५ लाख वृक्षलागवडीचा संकल्प
By admin | Published: June 17, 2016 12:18 AM