पालकमंत्री प्रवीण पोटे : ७ जुलैपर्यंत अभियान ,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वन विभागाने गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत २ कोटींहून अधिक झाडे लावण्याचे कार्य लोकसहभागातून पूर्ण झाले. त्यामुळे यंदा ४ कोटी झाडे लावण्याचा निर्धार शासनाने केला व त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा राज्यात चार कोटींहून अधिक वृक्षारोपण होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.वनविभागातर्फे चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वडाळी राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपणाद्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते. खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीईओ किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.पोटे म्हणाले की, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनिश्चित पर्जन्यमान, प्रदूषण, वन्यजीवांनी जंगल सोडून शहरात शिरणे अशा विपरीत गोष्टींवर वनांच्या निर्मितीतून मात करता येईल.
लोकसहभागातून चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प
By admin | Published: July 02, 2017 12:08 AM