जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विषयी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आली आहे. या विषयी आता संबंधित ग्रामपंचायतींच्या मासिक सभा व विशेष ग्रामसभा बोलावून संयुक्तिक व सर्मथनीय अभिप्राय शासनाने सात दिवसांच्या आत मागविले आहेत. विधानसभा निवडणूक पूर्व नगरपंचायतीचा तिढा सुटावा यासाठी नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या हालचाली सुरु तालुक्याचे मुख्यालय असणार्या तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी २५ हजारांच्यावर लोकसंख्येच्या निकषात ही गावे मोडत नसल्यामुळे शासनाने या ठिकाणी ‘क’ वर्ग दर्जा असणारी नगरपंचायत करण्याचा निर्णय घेतला. या विषयीचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. विधानसभेत घोषणा केली. १ मार्च २0१४ रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केला व यावर ३0 दिवसांच्या आत आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. परंतु ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास मुदतीच्या अवधित प्राप्त झाली नाही. याविषयी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे उपसचिव नरेश गिते यांनी ३ मे २0१४ रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देऊन या सर्व ग्रामपंचायतींची विशेष ग्रामसभा व मासिक सभा बोलावून सात दिवसांच्या आत सर्मथनीय ठराव व अहवाल पाठविण्याचे स्पष्ट केले. तसेच या ग्रामपंचायतच्या संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशिल विहित प्रपत्रात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागविला आहे.
नगरपंचायतीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक
By admin | Published: May 29, 2014 1:35 AM