शेतमालाला हमीभाव : जिल्हा काँग्रेसचा पुढाकारअमरावती : शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाच्या हमीभावाच्या मागणीसाठी १ मे या महाराष्ट्रदिनी जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांमध्ये ठराव मांडले जाईल. याअनुषंगाने जिल्हा काँग्रेसतर्फे पुढाकार घेण्यात आला. अशाप्रकारचे ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी शासनाकडून मान्य करण्यासाठी आणखी एक संवेदनशील मार्गाने महाराष्ट्रदिनी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी हितासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी कर्जमाफीचा ठराव घेण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, याकरिता काँग्रेस पक्ष लढा देत आहे. परंतु भाजप सरकारला अजूनही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जाग येत नाही. त्यामुळे सरकारला कर्जमाफी व हमीभाव देण्यास भाग पाडण्यासाठीच ग्रामसभेत ठराव घेतले जाणार आहेत.- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमेटी
कर्जमाफीसाठी घेणार ठराव
By admin | Published: May 01, 2017 12:07 AM