अमरावती : शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याच्या अनुषंगाने गुरुवारी महापालिकेत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विकासकामांवर मंथन झाले. नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल पालकमंत्र्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. ‘अधिकारी असलात तरी तुम्ही जनतेतून निवडून येऊ शकत नाही, नगरसेवकांना निवडून येताना काय यातना सहन कराव्या लागतात, याची तुम्हाला जाणीव नाही’ त्यामुळे यापुढे नगरसेवकांना सन्मान मिळाला नाही तर खैर नाही, असे खडे बोल सुनावत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सदस्यांची मने जिंकली.महापालिकेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी महापौर चरणजित कौर नंदा, आयुक्त अरुण डोंगरे, पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल आदी आर्वजून उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी आयुक्त डोंगरे यांनी प्रास्ताविकातून महापालिकेची सद्यस्थिती विषद केली. दरम्यान प्रकाश बनसोड, प्रदीप बाजड, चेतन पवार, अविनाश मार्डीकर, प्रदीप दंदे, विलास इंगोले, अजय गोंडाणे, तुषार भारतीय, कांचन ग्रेसपुंजे, सुजाता झाडे, जयश्री मोरे, रेखा तायवाडे, दीपमाला मोहोड, अर्चना इंगोले, मंजुषा जाधव, कुसुम साहू, राजेंद्र तायडे, प्रवीण हरमकर, प्रशांत वानखडे, मो.इमरान, हमीद शद्दा, अंजली पांडे, संजय अग्रवाल, दीपक पाटील, भूषण बनसोड, जयश्री मोरय्या, अंबादास जावरे, निर्मला बोरकर आदी सदस्यांनी विकास कामे, प्रस्तावित कामांच्या समावेशाबाबत मते नोंदवली. आढावा बैठकीनंतर काही तरी ‘रिझल्ट’ मिळणार अशी आशा सर्वच नगरसेवकांच्या चेहऱ्यावर जाणवली. मात्र, ना. पोटे यांनी महापालिकेत अधिकारी, नगरसेवकांमध्ये समन्वय नसल्याची बाब वशेष करुन उपस्थित केली. तसेच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.
नगरसेवकांचा सन्मान राखा
By admin | Published: January 23, 2015 12:46 AM