शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

वरूड येथे महाराजस्व अभियानाला प्रतिसाद

By admin | Published: September 06, 2015 12:06 AM

समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप ...

प्रवीण पोटे : मायबाप समजून नागरिकांची कामे करा वरुड : समाजाचे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या नागरिकांना मायबाप समजून कामे करण्याचे कळकळीचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित महाराजस्व अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केले.पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले की, ज्या सरकारने साठ वर्षांत केले नाही ते आम्ही नऊ महिन्यांत करून दाखविले. जलशिवार योजनेअंतर्गत २४१ टीएमसी पाण्याची उपलब्धता होऊन १५ हजार हेक्टर जमिनीची सिंचन व्यवस्था झाली. शासनाच्या लोकहिताच्या अनेक योजना आहेत. त्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचत नाही. याकरिता कार्यकर्त्यांनी पुढे येऊन कार्य करावे. या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना घेता येईल. आम्ही मंत्री जरी असलो तरी जनतेचे सेवक आहोत, हे विसरुन चालणार नाही. अधिकारी हा शासनाचा चेहरा असता. तो पारदर्शीर् असणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी कामात हयगय केल्यास आम्हाला कळवा. त्याला वठणीवर आणण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाहून आ. अनिल बोंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील सिंचन प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. नागठाणा २, भेमडी, झटामझीरी तसेच पवनी प्रकल्प आहे. भ्रष्टाचारामुळेच पंढरी प्रक्लपाचा कंत्रादार जेलमध्ये गेल्याचेही सांगण्यास ते विसरले नाही. यावेळी आ. अनिल बोंडे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्ष सरिता चेरडे, पंचायत समिती सभापती निता जिचकार, वसुधा बोंडे, जि.प.सदस्य अर्चना मुरुमकर, सुनीता डाहाके, बबन लायदे पाटील, प्रभाकर काळे, रमेश देशमुख, बाळासाहेब मुरुमकर, प्रभाकर काळे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपविभागिय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले. यामध्ये महाराजस्व अभियानाबाबत माहिती दिली. सर्व विभाग एकाच छताखाली आणून एकाच दिवशी नागरिकांची कामे करण्याचा उद्देश असल्याचेही सोगितले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय संलग्नीत रक्तदाता संघाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. होते यावेळी रुग्णालयाचे अधीक्षक प्रमोद पोतदार, जितेेंद्र शेटीये, सचिव चरण सोनारे, पंकज केचे यांचा पालकमंत्री पोटे, आ. बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रक्तदाता संघाबाबत माहिती संजय खासबागे यांनी दिली. महाराजस्व अभियानादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)