शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

लोकाभिमुख प्रशासनासाठी वनविभागात ‘पालक’ संकल्पना, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसचिवांकडे जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:06 PM

राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे.

अमरावती, दि. 23 - राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे. त्याकरिता ११ वनवृत्तांमध्ये महसूल व पोलीस खात्याच्या धर्तीवर कारभार सांभाळण्यासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य सचिवांकडे जबाबदारी सोपविली आहे.राज्य शासनाकडून वनविभागात विविध योजना, उपक्रम सातत्याने राबविले जातात. मात्र, यापैकी बहुतांश योजना, उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे वनविभागाला लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात ११ वनवृत्तनिहाय अतिरिक्त प्रधान वनसचिवांकडे पालकत्व सोपविण्यात आले आहे. महसूल व पोलीस खात्याच्या धर्तीवर वनविभागाचाही कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.वनवृत्तनिहाय दरमहिन्याला आढावा बैठक घेऊन शासनाकडे अहवाल पाठविण्याची जबाबदारी अपर प्रधान मुख्य वनसचिवांकडे सोपविण्यात आली आहे. नागरिकांशी संबंधित प्रश्न, समस्या सोडवितानाच जंगलांमध्ये वाढते अतिक्रमण रोखण्याचे आव्हान देखील ‘पालक’ संकल्पनेवर सोपविले आहे. ही संकल्पना व्याघ्र प्रकल्प वगळून राबविली जाईल. नाशिक, धुळे, पुणे, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, नागपूर, ठाणे, चंद्रपूर आणि गडचिरोली वनवृत्तात ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे २२ आॅगस्ट २०१७ रोजी शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.‘पीसीसीएफ’ला पालकमंत्री समतुल्य दर्जाराज्यभरात ११ वनवृत्तात पालक संकल्पना राबविण्यासाठी अतिरिक्त प्रधान मुख्य सचिवांकडे जबाबदारी सोपविली आहे. एपीसीसीएफ पालकमंत्री म्हणून वनविभागाचा कारभार पाहतील. राज्य शासनाने वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. वनाधिकारी, कर्मचाºयांचे प्रश्न, समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहून असून त्या सोडविण्याची जबाबदारी देखील ‘एपीसीसीएफ’ची राहणार आहे.