शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

१,४७७ कोटींचे कर्जवाटप बाकी

By admin | Published: May 11, 2017 12:04 AM

यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला असताना बँकांद्वारा पीककर्जाचे वाटप झाले नाही.

खरीप ऋण : राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांचा टक्का निरंकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला असताना बँकांद्वारा पीककर्जाचे वाटप झाले नाही. सध्या जिल्हा बँकेने २६.२५ टक्के वाटप केले असले तरी राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांचा टक्का निरंक आहे. तुरीचे महिनाभरापूर्वीचे पेमेंट रखडले आहे. कर्जमाफीच्या चर्चेने एक लाख ६७ हजार ४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत. याशेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारत असल्याने शासनानेच यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १५९२ कोटी ५४ लाख ८० हजार रूपये पीककर्जाचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा बँकेला ५१६ कोटी ६० लाख, राष्ट्रीयीकृत बँकांना १०६२ कोटी ६ लाख व ग्रामीण बँकेला १३ कोटी ८८ लाख रूपयांचा लक्ष्यांक दिला आहे. यातुलनेत जिल्हा बँकेने १४ हजार ३५६ शेतकऱ्यांना २९ हजार ८५७ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. हा कर्जवाटपाचा टक्का २६.२५ असला तरी राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांचे कर्जवाटप निरंक असल्याने कर्जवाटपाचा सरासरी टक्का मात्र ८.५१ इतका आहे.सहकार विभागाद्वारा यंदाच्या खरीप हंगामासाठी ३० जून ही कर्जवाटपाची ‘डेडलाईन’ दिली आहे. प्रतीहेक्टरी पीककर्जवाटपासाठी राज्य व जिल्हास्तरीय समितीने दर ठरवून दिले आहेत. मात्र, बँकांनी अद्याप कर्जवाटपाचा वेग वाढविलेला नाही. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्रात जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीला सुरूवात होते. यंदाच्या खरिपासाठी कृषी विभागाने सात लाख २८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. सध्या जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे व खतांसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची निकड आहे. खरिपासाठी बँकांचे कर्जवाटपअमरावती : मात्र, बँकांनी खरीप कर्जवाटपास हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे सद्यस्थितीत अलाहाबाद बँकेने ८ लाख, आंध्रा बँक ८ लाख, बँक आॅफ बडोदा १२ लाख, बँक आॅफ इंडिया २९ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र ३.९८ लाख, कॅनरा बँक ९ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४.९४ लाख, कार्पोरेशन बँक ४ लाख, देना बँक ४० लाख, आयडीबीआय ११ लाख, इंडियन बँक ८ लाख, पंजाब नॅशनल बँक १५ लाख, एसबीआय ७.२८ लाख, युको बँक ४ लाख, युनियन बँक आॅफ इंडिया ११ लाख व विजया बँकेद्वारा ८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. १,६७,४२६ शेतकरी बँकांचे थकबाकीदारजिल्ह्यात चार लाख १५ हजार ८५८ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ९४ हजार ५८० शेतकरी बँकांचे सभासद आहेत. यापैकी गतवर्षी जिल्हा बँकेने ५७ हजार ३५७, राष्ट्रीयीकृत बँकांनी एक लाख सहा हजार ९३२ व ग्रामीण बँकांनी १४३२ शेतकऱ्यांना कर्जवाटप केले आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे ३५.८३३, राष्ट्रीयीकृत बँकेचे १,३१,०९१ व ग्रामीण बँकेचे ५०२ असे एकूण १,६७,४२६ शेतकरी थकबाकीदार आहेत.‘एनओसी’ ऐवजी ’डिक्लेरेशन’ ग्राह्यभारतीय रिझर्व्ह बँकेने द्यावयाच्या एक लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी तारण आवश्यक नसल्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचप्रमाणे ५० हजारापर्यंतच्या कर्जासाठी अन्य वित्तीय संस्थांचा ‘नो देय दाखला’ घेण्याऐवजी संबंधित शेतकऱ्यांचे स्वयंघोषणापत्र घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.८२,६६१ शेतकरी बँकिंगपासून दूरजिल्ह्यातील ३,३३,१८७ शेतकरी बँकांचे कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ९३,१९०, राष्ट्रीयीकृत बँकेचे २,३८,०२३ व ग्रामीण बँकेचे १९८४ शेतकरी सभासद कर्जदार आहेत. जिल्ह्यात अद्याप ६१,३८३ शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज घेतलेले नाही व २१,२७६ शेतकरी अद्याप सभासद व्हायचे आहेत. यांना बँकिंगच्या प्रवाहात आणण्याचे शासन निर्देश आहेत. ८० टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टराज्य शासनाने ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. कर्जापासून वंचित शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात कर्जपुरवठा करण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत. पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा समन्वय समितीमार्फत निश्चित करून बँकेच्या फलकावर प्रसिद्ध करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील बँकाद्वारा नियमित कर्जवाटप सुरू आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची मागणी कमी आहे. शेतकऱ्यांनी देखील त्यांचेकडील कर्जाचा भरणा करून नव्याने कर्ज घ्यावे.- जितेंद्र झा,व्यवस्थापक, अग्रणी बँक.