महापालिकेची कारवाई : पिंजरे, काटे, तराजू जप्तअमरावती : स्थानिक शेगाव नाका परिसरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर शुक्रवारी महापालिका पशुशल्य विभागाने कारवाई केली आहे. रस्त्यालगत मांस विक्रीला कायम लगाम लावण्याचा निर्णय घेताना विक्रेत्यांना दुकाने कशी देता येतील, याचे नियोजन आयुक्त अरुण डोंगरे हे करीत आहेत.उघड्यावरील मांस विक्री ही नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहचवित असल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्त डोंगरे यांच्या आदेशानुसार पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कारवाई करण्यात आली. शेगाव नाका ते शेगाव या गावापर्यंत जाणाऱ्या मार्गालगत सर्रासपणे होणाऱ्या मांस विक्रीमुळे ये- जा नागरिकही त्रस्त झाले आहे. उघड्यावर मांस विक्री रोखण्यासाठी या भागाच्या नगरसेविका अर्चना इंगोले यांनी अक्षरश: सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले होते, हे विशेष. उघड्यावरील मांस विक्रीने मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढीस लागल्याची तक्रार देखील परिसरातील नागरिकांची आहे. अर्चना इंगाले यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने अनेकदा कारवाई केली आहे. मात्र, दोन, चार दिवस झाले की पुन्हा मांस विक्री सुरु होते, हे वास्तव आहे. शुक्रवारी शेगाव नाका, अप्पर वर्धा वसाहत परिसरात उघड्यावर मांस विक्रीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.नाल्याच्या काठावर दुकाने निर्मितीचा प्रस्तावशेगाव रस्तावर उघड्यावर सुरु असलेल्या मांस विक्रीला कायम लगाम लावण्यासाठी विक्रेत्यांना हक्काची दुकाने मिळावीत, यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नाल्याच्या काठी लिजवर दुकाने निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, नगरसेविका अर्चना इंगोले, सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांनी जागेची पाहणी केली आहे. शाळा असलेल्या भागात मांस विक्रीची दुकाने निर्माण करणे शक्य नसल्याचे शहर अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना कळविले आहे. याप्रकरणी लवकरच तोडगा काढला जाईल, असे संकेत आहेत.
शेगाव नाका येथे उघड्यावरील मांस विक्रीला लगाम
By admin | Published: April 03, 2015 11:58 PM