अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थी आले आहेत.विद्यापीठात निकालाची सुसाट गाडी असली तरी मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल घोषित झाले नाही. बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर होण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली. बी.ए.चे ३० हजार विद्यार्थी, तर बी.कॉमचे १९ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. मध्यंतरी विद्यापीठात मूल्यांकनासासाठी प्राध्यापकांनी पाठ फिरवली होती. परिणामी बी.ए, बी.कॉमचे निकाल माघारले आहे. मात्र, उशिरा निकालामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव होणार आहे. अन्य ठिकाणी अथवा विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेशासाठी जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. काही विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालयात एम.ए. एम.कॉम. अशा पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.
बी.ए., बी.कॉम.चे निकाल रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:44 PM
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थी आले आहेत.
ठळक मुद्देपदव्युत्तर प्रवेश केव्हा? : मूल्यांकनास विलंब