अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी, फार्मसी व विधी शाखांच्या अभ्यासक्रमांच्या ५ ते १५ मे या कालावधीत ऑनलाईन परीक्षांचे नियोजन केले होते. त्यामधील अभियांत्रिकीच्या पाचव्या व सातव्या सत्राचे निकाल ९ व १० मे रोजी जाहीर करण्यात आले.
सीजीएसमध्ये बी.ई.च्या कम्प्यूटर, बायोमेडिकल, सिव्हिल, कम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, केमिकल इंजिनीअरिंग तसेच बी.टेक.च्या फूड (केमिकल टेक्नॉलॉजी), ऑईल अँड पेंट (केमिकल टेक्नॉलॉजी), पेट्रोकेमिकल (केमिकल टेक्नॉलॉजी), पल्प अँड पेपर(केमिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांचे पाचव्या सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. याशिवाय बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (सीजीएस) या अभ्यासक्रमाचादेखील निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मू्ल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.