गजानन मोहोड ल्ल अमरावतीआंबियाचा संत्रा झाडावर असतानाच फळगळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून मशागत खर्चदेखील सुरू आहे. बगिचा घ्यायला व्यापारी फिरकत नाही, बाजार समितीत व्यापारी मातीमोल भावाने संत्र्याची मागणी करतात. अशा स्थितीत वर्ग-१ चे सेवानिवृत्त अभियंता बाबा भाकरे यांनी थेट रस्त्यावर संत्राविक्री सुरू केली आहे.समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे४प्रतिकूल परिस्थितीत, नापिकी, व्यापाऱ्यांचे षडयंत्र यात शेतकरी पिचला जात असताना समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचीच मुले शहरात नोकरीसाठी आली अन् त्यांच्या मालाचे भाव करतात. अवहेलना करतात, हे चुकीचे असल्याचे भाकरे यांनी सांगितले.
निवृत्त ‘क्लास वन’ अभियंता फुटपाथवर विकतोय संत्री!
By admin | Published: November 03, 2015 1:43 AM