लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आमदार रवि राणा यांच्या घरासमोर बेशरमचे रोपटे लावण्याचा निर्धार करणाऱ्या भारतीय यांनी ऐनवेळी माघार घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले.तुषार भारतीय यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी दुपारी २ च्या सुमारास आ. राणा यांचा निषेध करीत त्यांच्या घराकडे कूच केली. नवाथे येथे रंगोली पर्ल हॉटेलजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. पोलीस म्हणाले, व्हॅनमध्ये बसा. तुमची नावे द्या. नंतर तुम्हाला सोडून देऊ. भारतीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही लगेचच पोलिसांचे ऐकले. सर्व जण पोलीस लॉरीत बसले. तत्पूर्वी, त्यांनी छोटेखानी सभा घेऊन पुन्हा आक्रमक इशारे दिले. पोलिसांनी दिलेल्या आकड्यानुसार भारतीय यांच्यासोबत ३५ कार्यकर्ते होते.'तुषार भारतीय म्हणतात मला!'पोलिसांच्या लॉरीत बसण्यापूर्वी तुषार भारतीय यांनी भाषण केले. राणा यांना उद्देशून ते म्हणाले, तू जेथे कार्यक्रम करतो, तेथेही माझे ५० लोक आहेत. एक इशारा केला, तर काय होईल तुझे? तुषार भारतीय म्हणतात मला. फक्त शहिदांना श्रद्धांजली आहे म्हणून थांबून आहे. याद राख, सज्जन माणसाशी पंगा घेतला, तर तुझे बाऊंसर कामाला येणार नाहीत. २५ डिसेंबरला पार्वतीनगर येथे भामटी महाराज मंदिराचे भूमिपूजन मी करणार आहे. तिथे असाच आला, तर गय करणार नाही. मातीत घालेन. बडनेºयातही मी उद्घाटन करणार आहे. तेथेही तुला येण्याची परवानगी देणार नाही. यापुढे कल्याणनगर ते यशोदानगर रस्त्याबाबत बोलला, पालकमंत्र्यांबाबत बोलला, तर याद राख, असे ते म्हणाले.
तुषार भारतीय यांची ऐनवेळी माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:01 PM
आमदार रवि राणा यांच्या घरासमोर बेशरमचे रोपटे लावण्याचा निर्धार करणाऱ्या भारतीय यांनी ऐनवेळी माघार घेतली. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण त्यांनी त्यासाठी पुढे केले.
ठळक मुद्देराणांना पुन्हा इशारे : शहीद दिनाचे दिले कारण