फोटो पी १६ परतवाडा
परतवाडा : शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायत परिक्षेत्रातील लक्ष्मी नगर येथील एका घरावर दरोडा टाकण्याच्या उद्दिष्टाने चारचाकी वाहनातून आलेले दरोडेखोर चड्डी-बनियान व मध्यरात्रीच्या २:३० वाजताच्या दरम्यान रविवारी मध्यरात्री सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळे दरोडेखोरांची चोरी पुन्हा सक्रिय झाली असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
कृषी अधिकारी विलास नेतनराव कांडली लक्ष्मी नगर येथे राहतात. कुटुंबासह घरात असताना १५ ऑगष्टच्या मध्यरात्री २ ते २.३० च्या दरम्यान अज्ञात सात ते आठ इसमांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कडी-कोंडा बाहेरून लावले, घरातच असता समोरच्या खोलीत वर्क फॉर होम मध्ये काम जागी असणाऱ्या मुलगी विशाखा नेतनराव हिला आवाज आला. त्यावरून शेजारी राहणाऱ्या राहुल खांडेकर यांना सीसीटीव्ही पाहण्यास सांगितले असता रस्त्यावर व एक वाहन आणि आवार भिंत विचार व उच्चार बाहेर चड्डी बनियानवर इसम असल्याचे दिसून आले. हेच चोरट्यांची टोळी झुडपात लपून होती. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. परिसरातीलच अमित मांडवगडे यांच्या घराच्या चैनल गेटचे कुलूप तोडताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
बॉक्स
समयसूचकता आणि पोलीसही पोहोचले
परिसरात रहिवासी असलेले जमादार राजू हिरुळकर यांना माहिती दिली. त्यांनी परतवाडा पोलिसांना यासंदर्भात सांगून सांगितले. लगेच पीएसआय गोपाल गोळे, दीपक डाहे, योगेश बडुकले, वैभव ठाकरे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांचे दोन्ही वाहन पोचहले, परिसरातील नागरिकांनी घराबाहेरील विद्युत दिवे लावतात चोरट्यांनी तिथून पळ काढला. दूरपर्यंत शोध घेतला असता पळून जाण्यात यशस्वी ठरले.