प्रामाणिकपणाचा परिचय : गाडगेनगर पोलिसांना सोपविला लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सातव्या-आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या चार चिमुकल्यांनी रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल पोलीस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचा परिचय दिला. सोमवारी ही घटना घडली. मोहित सतीश जावरकर (१३), सक्षम प्रवीण यावले (७), हर्ष माणिकराव खडसे (१२), मणि सुनील ठाकरे (१२), अशी प्रामाणिक विद्यार्थ्यांची नावे आहेत. मोहित हा गणेशदास राठी विद्यालय, सक्षम गोल्डन किड्स, हर्ष गणेशदास राठी तर मणी हा यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. पलाश लाईन परिसरातील रहिवासी हे विद्यार्थी खेळत असताना राठीनगरातील सनराईज शाळेजवळ त्यांना महागडा अँड्रॉईड सापडला. पोलिसांनी भ्रमणध्वनीतील क्रमांकांवरून चौकशी केली असता सदर मोबाईल हा राठीनगरातील एका मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. मुलीसोबत संपर्क करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून पीएसआय बळीराम राठोड यांनी तो मोबाईल तिच्या सुपूर्द केला.
सापडलेला मोबाईल चिमुकल्यांनी केला परत
By admin | Published: June 21, 2017 12:10 AM