आरपीएफची दखल : महाराष्ट्र एक्सप्रेसमधील घटना बडनेरा : महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका युवतीचा लॅपटॉप असणारी बॅग रेल्वेतच राहून गेली. तक्रारीनंतर तत्काळ दखल घेत रेल्वे सुरक्षा बल बडनेऱ्याच्या कर्मचाऱ्यांनी ती बॅग ताब्यात घेतली. सदरचा 'लॅपटॉप' प्रवाशाच्या नातेवाईकाला परत करण्यात आला आहे. पूजा त्रिवेदी वय २५ राहणार बालाघाट ही युवती ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करीत होती. तिच्याजवळ असणारा लॅपटॉप चार्जरची बॅग गाडीतच राहून गेल्याने त्याच माहिती तिने नागपूर आरपीएफला दिली होती. त्यानंतर बडनेरा आरपीएफला सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक सी.एस. पटेल यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी जीवीतराम यांनी ती बॅग रेल्वे मधून ताब्यात घेतली. लॅपटॉप असणारी बॅग अकोला रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या नातेवाईकाला परत करण्यात आली. अलीकडे प्रवाशांची नजरचुकीने रेल्वेत राहून गेलेल्या बॅग्स प्रवाशांना रेल्वे पोलीस व आरपीएफकडून परत केल्या गेल्या. आपली बॅग मिळाल्याने प्रवाशाने समाधान व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)
विसरलेला ‘लॅपटॉप’ प्रवाशाला दिला परत
By admin | Published: November 09, 2016 12:27 AM