फोटो पी २१ बारगळ
अमरावती : तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी ग्रामीण क्षेत्रात राबविलेल्या महिला तक्रारपेटी या उपक्रमाचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे. त्या पेट्या, त्यातील तक्रारी, सोडवणूक व कारवाईचा आढावा घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही नवनियुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यापूर्वी अमरावती ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक व शहर आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून काम केलेल्या बारगळ यांनी सोमवारी दुपारी अमरावतीचे एसपी म्हणून पदभार सांभाळला. पोलीस कर्मचाऱ्यांचे कल्याण, दाखल गुन्ह्यांची तातडीने उकल, मालमत्ता व महिलाविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध व महिलाविषयक गुन्ह्यांचा विनाविलंब तपास करून मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे ते म्हणाले. १९९८ साली महाराष्ट्र पोलीस सेवेत थेट डीवायएसपी म्हणून रुजू झालेल्या बारगळ यांना सन २०२० मध्ये आयपीएस मिळाले आहे.
/////////
बॉक्स
आठवड्यातून एकदा साधणार कर्मचाऱ्यांशी संवाद
ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एकदा पोलीस अधीक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. त्यात त्यांना येणाऱ्या अडचणी, खातेविषयक समस्या तथा वैयक्तिक अडीअडचणी सोडविण्यावर भर दिला जाणार आहे. तो ‘ओआर’ ठाणेनिहाय किंवा उपविभागानुसार निश्चित केला जाणार आहे.
////////